Maharashtra Assembly | (Photo Credit: Twitter / MAHARASHTRA DGIPR)

महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज (3 मार्च) पासून सुरू होत आहे. मुंबई मध्ये पार पडणार्‍या या अधिवेशनामध्ये अनेक विषय वादळी ठरण्याची शक्यता आहे. नवाब मलिकांचा राजीनामा ते शेतकर्‍यांचे प्रश्न यावरून विरोधक आक्रमक होणार असल्याची चिन्हं आहे. दरम्यान त्याची स्पष्ट माहिती विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी काल मीडीयाशी बोलताना दिली आहे. आजपासून सुरू होणारं अर्थसंकल्पीय अधिवेशन (Budget Session) 25 मार्च पर्यंत चालणार आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) 10 मार्चला आर्थिक सर्वेक्षण आणि 11 मार्चला बजेट सादर करणार आहेत. हे देखील नक्की वाचा: Maharashtra Budget Session 2022: महाराष्ट्र भाजप नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच, देवेंद्र फडणवीस यांचे पुन्हा सुतोवाच; आज अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापाण्यावरही बहिष्कार .

यंदाच्या विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक देखील होणार असल्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे. त्यासाठी राज्य सरकार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून ही निवडणूक पार पाडतील. विधिनमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशनात प्रस्तावित विधेयके व अध्यादेश यासह प्रलंबित विधेयके मांडली जातील. प्रलंबित विधेयक 1, प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त) 4 आणि प्रस्तावित विधेयके (मंत्रिमंडळ मान्यता अपेक्षित) 3 ही विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोरोनाच्या मागील दोन वर्षांच्या काळामध्ये अधिवेशन हे जेमतेम 8 दिवसांचे होते. त्यामुळे विरोधकांकडून वारंवार सरकार चर्चा टाळत असल्याचे आरोप करत होते. मात्र यंदाचे अधिवेशन हे 22 दिवसांचे आहे. कोरोनाचं संकट आटोक्यात आल्याने यंदाच्या अधिवेशनाचा कालवधी वाढवण्यात आला आहे.