महाराष्ट्रामध्ये अर्थमंत्री अजित पवार यांनी आज (6 मार्च) विधानसभेमध्ये महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पाच्या वाचनाला 11 वाजता सुरूवात केली आहे. दरम्यान आज सादर होत असलेल्या या अर्थसंकल्पाकडे सामान्यांचे लक्ष लागले आहे. काल विधिमंडळामध्ये सादर करण्यात आलेल्या राज्याच्या आर्थिक सर्वेक्षण अहवालामधून राज्यावरील कर्जाचा बोझा वाढत असल्याचं समोर आले आहे. आता शेतकरी, महिला, तरूणाई यांच्यासाठी या महाराष्ट्र अर्थसंकल्प 2020-21 मध्ये काय महत्त्वाच्या घोषणा होणार? याकडे सार्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान आज महाविकास आघाडीच्या पहिल्या अर्थसंकल्पाचे वाचन विधानभवनात अजित पवार यांच्याकडून तर विधानपरिषदेमध्ये शुंभुराजे देसाई यांच्याकडून वाचन होत आहे. मग पहा राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये काय होणार आहेत महत्त्वपूर्ण घोषणा? तर विधानसभेतून थेट लाईव्ह स्ट्रिमिंग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.
महाविकास आघाडी सरकारच्या आज विधिमंडळामध्ये सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामध्ये शिक्षण, महिला व बालविकास कल्याण पासून ते सामान्य तरूणांसाठी काही लोकप्रिय घोषणा करण्यात आल्या आहेत. दरम्यान सामान्यांना मुलभूत सोयी-सुविधा देण्यासाठी काही महत्त्वाच्या प्रकल्पांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने सादर केलेल्या अर्थसंकल्पामधून तुम्हांला काय मिळणार?
महाराष्ट्र अर्थसंकल्प 2020-21 मधील महत्त्वाच्या घोषणा
- जनतेला चांगल्या सुविधा देण्यासाठी सरकार कटिबद्ध
- आर्थिक मंदीमुळे उद्योग जगताला फटका, उद्योगधंदे अडचणीत
शेतकर्यांसाठी कर्जमाफी
-
- शेतकर्यांसाठी महाविकास आघाडीची घोषणा, 2 लाखापेक्षा अधिक कर्ज असणार्यांना दिलासा.
- पायाभूत सुविधांची किंमत 2 लाख 48 हजार कोटी, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न
- महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 9 हजार 35 कोटी रक्कमेची कर्जमाफी देण्यात आली. 2 लाखापेक्षा जास्त पीककर्ज असणाऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर झाली. कर्जमाफीसाठी 22 हजार कोटी रुपयांचा निधी देण्यात येत आहे.
- नागपूर जिल्ह्यामध्ये उर्जा पार्क उभारणार
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 6, 2020
वाहतूक व्यवस्था
-
-
- कोकणचा विकास करण्यासाठी सरकारचं प्राधान्य,रस्त्यांचा विकास करण्यावर भर
- पुण्यामध्ये मेट्रोचा विस्तार केला जाणार, स्वारगेट ते कात्रज पर्यंत होणार विस्तार तसेच वनाज-रामवाडी मेट्रो मार्गाचंही विस्तारीकरण
- सोलापूर, पुणे शहरामध्ये नवं विमानतळ सुरू करणार
- आत्याधुनिक मिनी बस, ग्रामीण भागात वायफाय युक्त बस येणार, 1600 नव्या बस दाखल होणार
-
आरोग्य विभाग
-
-
-
- ग्रामीण भागातील आरोग्य विभागासाठी 5 हजार कोटी
- 20 डायलिसीस केंद्रे उभारणार, 996 प्रकारचे उपचार मोफत होणार, गुडघा पुर्नरोपणाचाही समावेश
- 102 क्रमांकाच्या जुन्या रूग्णवाहिका बदलल्या जाणार
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) March 6, 2020
शिक्षण विभाग
-
-
-
-
- सर्व शाळा आदर्श निर्माण करण्याचा मानस, सर्व शाळांना इंटनेटच्या जाळ्याने जोडणार
- दहावी उत्तीर्ण व्यक्तींना रोजगार प्रशिक्षण, 21 ते 28 वर्ष वयोगटातील बेरोजगारांना सक्षम करणार, पाच वर्षात 10 लाख बेरोजगारांना प्रशिक्षण
- 21-28 वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांसाठी विशेष योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. तर नवीन शिकाऊ उमेदवार योजना जाहीर
-
-
-
महिलांसाठी खास घोषणा
-
-
-
-
- महिला सुरक्षेसाठी सरकार कटिबद्ध, प्रत्येक जिल्ह्यात एक महिला पोलिस ठाणे उभारणार
- महिला आणि तरूणींना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिले जाणार
-
-
-
आर्थिक अहवालानुसार राज्यावरील कर्जाचा बोजा वाढल्याचे दिसून आले आहे. याच पार्श्वभुमीवर सातव्या वेतन आयोगामुळे तिजोरीवरील भार 24 हजार कोटी रुपयांनी वाढला आहे. तसेच गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्यात दीड लाख रोजगार कमी झाला आहे. राज्यात बेरोजागारीचा दर 8.3 टक्के आहे. 24 फेब्रुवारी 2020 पासून सुरू झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची सांगता 20 मार्च दिवशी होणार आहे.
-
-