Maharashtra Budget 2019: महाराष्ट्र अर्थसंकल्प 2019 मध्ये सरकारने केल्या 'या' महत्त्वाच्या घोषणा

लोकसभा निवडणुकीपूर्वी 27 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने अर्थसंकल्प मांडला होता. मात्र ऑक्टोबर महिन्यादरम्यान यंदा निवडणूका घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आज मांडण्यात आलेमा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प आहे.

Maharashtra Budget 2019: महाराष्ट्र अर्थसंकल्प 2019 मध्ये सरकारने केल्या 'या' महत्त्वाच्या घोषणा
Maharashtra State Interim Budget 2019: Bjp Shiv Sena Government ministers Sudhir Mungantiwar and Deepak Kesarkar will present Interim Budget Today | (Photo credit: archived, edited, representative image)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूका येत्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आज विधानमंडळात अर्थसंकल्प सादर झाला. अपेक्षेप्रमाणे हा लोकाभिमुख आणि सवलतींचा पाऊस पाडणारा ठरला आहे. आज सुधीर मुनगंटीवर (Sudhir Mungantiwar) यांनी विधानसभेत आणि दीपक केसरकर (Deepak Kesarkar)  यांनी विधानपरिषदेमध्ये अर्थसंकल्प मांडला आहे. महाराष्ट्र सरकारने सध्या दुष्काळाशी सामना करणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी काही घोषणा केल्या आहेत. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी महाराष्ट्र अर्थसंकल्प 2019 मध्ये शेतकऱ्याला काय दिलं पाहा

महाराष्ट्र बजेट 2019-20 मधील महत्त्वाच्या घोषणा

  •  अण्णाभाऊ साठे जन्मशताब्दी वर्षासाठी 100 कोटी
  • ओबीसी मुला-मुलींच्या वसतिगृहाची बांधणी करण्याकरता दोनशे कोटी रुपयांची तरतूद
  • चार कृषिविद्यापीठांसाठी ६०० कोटींची तरतूद

लोकसभा निवडणुकीपूर्वी 27 फेब्रुवारी रोजी राज्य सरकारने अर्थसंकल्प मांडला होता. मात्र ऑक्टोबर महिन्यादरम्यान यंदा निवडणूका घोषित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता आज मांडण्यात आलेमा अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प आहे.

(The above story first appeared on LatestLY on Jun 18, 2019 04:05 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).