Maharashtra budget 2019: Sudhir Mungantiwar & Deepak Kesarkar | (Photo Credits: Twitter)

Maharashtra Monsoon Session, Maharashtra Budget 2019-20: राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु आहे. अधिवेशनादरम्यान अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार राज्याचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. आजच्या अर्थसंकल्पात दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकरी, शेतकरी योजना राज्यावरील जल संकट, चार छावण्या, जल सिंचन योजना असे शेतीशी संबंधीत विविध घटक महत्त्वाचे ठरले. जाणून घ्या आज सादर झालेल्या महाराष्ट्र अर्थसंकल्प 2019 राज्य सरकारने शेतकऱ्याला काय दिलं ?

दुष्काळात शेतकऱ्याला काय मिळालं?

  • दुष्काळासंबंधी तक्रारींसाठी महाराष्ट्र सरकारनं केला व्हॉट्स अॅपचा वापर
  • २४ जिल्ह्यात ४ हजार ४६१ कोटींचं अनुदान वाटप सरकारकडून झाले.
  • राज्यातील १५१ तालुक्यात दुष्काळ जाहीर
  • शेळी आणि मेंढी यांच्यासाठी चारा छावण्या उभारण्याचा निर्णय
  • चारा छावण्यांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याचा निर्णय
  • जल संकटावर मात करण्यासाठी पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई नियंत्रण कक्षाची स्थापना
  • चार वर्षांत १४० सिंचन योजना पूर्ण झाल्या. त्यासाठी ८ हजार ९४६ कोटी रुपये निधी जलयुक्त शिवार योजनेत खर्च करण्यात आले.

जलसिंचनावर काय काम झाले?

  • जलसिंचन योजनेसाठी १ हजार ५३० कोटींची तरतूद
  • कृषी सिंचन योजनेसाठी २ हजार ७२० कोटींची तरतूद
  • चार कृषी विद्यापिठांसाठी ६०० कोटींची तरतूद

शेतकऱ्याला काय मिळाले?

  • जमिन महसूलात सूट, शेतीशी निगडीत कर्जाच्या वसूलीस स्थगिती
  • कृषीपंपाच्या चालू वीज देयकात ३३.५ टक्के सुट
  • शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परिक्षा शुल्कात माफी
  • टंचाई जाहिर केलेल्या गावात शेतीच्या पंपाची वीज जोडणी खंडीत न करणे
  • शेतकऱ्यांना थेट बाजारपेठ मिळावी यासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने प्रकल्प राबवण्यात येणार.
  • राज्यात १६३५ चारा छावण्या सुरू करण्यात आल्या. त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढ
  • बळीराजा जलसंजिवनी योजनेकरीता सन 2019-२० या आर्थिक वर्षाकरीता रूपये १ हजार ५३१ कोटी एवढी भरीव तरतूद
  • सन 2019 च्या मान्सून कालावधीत आधुनिक तंत्रज्ञानाद्वारे कृत्रिम पाऊस पाडण्याच्या प्रयोगास मान्यता
  • मागील साडेचार वर्षात १४० सिंचन प्रकल्प पूर्ण करण्यात आले

(हेही वाचा, LIVE Maharashtra Monsoon Session 2019 Live News Updates: सरकारच्या धोरणांमुळेच दुष्काळग्रस्तांचे स्थलांतरण वाढले: धनंजय मुंडे)

दरम्यान, राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारच्या सत्ताकाळातील हे शेवटचेच अधिवेशन आहे. कारण यानंतर थेट विधानसभा निवडणुकाच लागणार आहेत. त्यामुळे आपल्या सत्ताकाळात झालेल्या विकासकामांचा पाढा वाचत राज्य सरकार आपले प्रगती पुस्तक मांडण्याची शक्यता होती. आजच्या अर्थसंकल्पात तेच दिसून आले. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पाडला.