Maharashtra Monsoon Session 2019 Live News Updates: सरकारच्या धोरणांमुळेच दुष्काळग्रस्तांचे स्थलांतरण वाढले: धनंजय मुंडे | LatestLY मराठी
Close
Advertisement
  बुधवार, सप्टेंबर 11, 2024
ताज्या बातम्या
32 minutes ago

Maharashtra Monsoon Session 2019 Live News Updates: सरकारच्या धोरणांमुळेच दुष्काळग्रस्तांचे स्थलांतरण वाढले: धनंजय मुंडे

महाराष्ट्र अण्णासाहेब चवरे | Jun 18, 2019 03:03 PM IST
A+
A-
18 Jun, 15:03 (IST)

 जलसंजिवनी योजनेसाठी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 1 हजार 531 कोटी एवढी भरीव तरतूद : सुधीर मुनगंटीवार

 

सरकारने राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला, पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई नियंत्रण क्षेत्राची स्थापना, शेळ्या आणि मेंढ्यांसाठी चारा छावण्यांची निर्मिती तसेच, बळीराजा जलसंजिवनी योजनेसाठी 2019-20 या आर्थिक वर्षासाठी 1 हजार 531 कोटी एवढी भरीव तरतूद : सुधीर मुनगंटीवार

18 Jun, 14:55 (IST)

एचआयव्ही बाधीत विद्यार्थ्यांचे अनुदान 990 रुपयांवर वरुन 1950 रुपये वाढविण्यात आला आहे. 

18 Jun, 14:53 (IST)

निराधार, परितक्त्या, घटस्फोटीत महिलांसाठी संजय गांधी योजना आणि श्रावणबाळ योजनेअंतर्गत एक लाख कोटी रुपयांची अर्थसहाय्य करण्यात आले.

18 Jun, 14:49 (IST)

 

महाराष्ट्रात गेल्या साडेचार वर्षांच्या काळात  3 लाख 87 हजार हेक्टर अतिरिक्त सिंचन क्षमता आणि 1 हजार 905 दशलक्ष घनमीटर (67 टीएमसी) पाणीसाठा निर्माण झाला आहेो : सुधीर मुनगंटीवार

 

18 Jun, 14:44 (IST)

राज्यात दुष्काळी जनतेसाठी राज्यात 1635 चारा छावण्या सुरु करण्यात आल्या असून त्यासाठी पशुधनाच्या अनुदानात वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. : सुधीर मुनगंटीवार

 

18 Jun, 14:42 (IST)

महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त ग्रामपंचायतींना 100 कोटी रुपयांचा निधी. तसेच, गावातील बाराबलुतेदार नागरिकांसाठी भरघोस निधी देण्याचा सरकारचा विचार

18 Jun, 14:39 (IST)

राज्यातील 151 तालुक्यात दुष्काळ जाहीर केला, पिण्याच्या पाण्यासाठी टंचाई नियंत्रण क्षेत्राची स्थापना, शेळ्या आणि मेंढ्यांसाठी चारा छावण्यांची निर्मिती : अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

18 Jun, 12:58 (IST)

राज्य सरकारच्या उदासीन धोरणामुळेच दुष्काळी जनतेचं मोठ्या प्रमाणावर स्थलांतरण झाल्याचा गंभीर आरोप धनंजय मुंडे यांनी विधान परिषदेत सरकारवर केला.

18 Jun, 12:44 (IST)

 

मोठे उत्सुकतापूर्ण वातावरण आणि राजकीय नाट्यमय वातावरणात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला खरा. पण, हा या विस्तारात मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या मंत्र्यांची मंत्रीपदं धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.  राधाकृष्ण विखे पाटील, जयदत्त क्षीरसागर, अविनाश महातेकर अशी या मंत्र्यांची नावं आहेत. दरम्यान,  अॅड. सतीश तळेकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आङे. या मंत्र्यांची  मंत्रिपद घटनाविरोधी असल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला आहे

 

18 Jun, 12:18 (IST)

राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार आज दुपारी, आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक लोकप्रिय घोषणांचा पाऊस पडण्याची शक्यता

Load More

Maharashtra Monsoon Session 2019 Live News Updates in Marathi: महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार (17 जून 2019) पासून सुरु झाले. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील संघर्षामुळे अधिवेशनाचा पहिलाच दिवस तसा राजकीय वातावरण तापवणारा ठरला. राज्यात सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्या नेतृत्वाखालील भाजप-शिवसेना युती सरकारच्या सत्ताकाळातील हे शेवटचेच अधिवेशन आहे. कारण यानंतर थेट विधानसभा निवडणुकाच लागणार आहेत. त्यामुळे आपल्या सत्ताकाळात झालेल्या विकासकामांचा पाढा वाचत राज्य सरकार आपले प्रगती पुस्तक मांडण्याची शक्यत आहे. तर, विविध विधेयके पास करत जनतेलाही दिलासा देण्याची शक्यता आहे. दरम्यान, राज्य सरकारच्या कारभारात राहिलेल्या त्रुटींवर विरोधक कसा प्रहार करतात हा देखील या अधिवेशनातील उत्सुकतेचा विषय असणार आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या पावसाळी अधिवेशनातील ताजे अपडेट घ्या जाणून...


Show Full Article Share Now