Maharashtra Board SSC Results 2019: महाराष्ट्र बोर्ड 10 वीचा निकाल mahresult.nic.in वर जाहीर; अ‍ॅडमिशन मध्ये आरक्षणाचा फायदा मिळवण्यसाठी तयार ठेवा 'ही' सरकारी कागदपत्रं!
Representational Image (Photo Credits: PTI)

महाराष्ट्र बोर्डाचे बारावीचे निकाल जाहीर झाल्यानंतर सर्वांना दहावीच्या निकालाची प्रतिक्षा होती. मात्र ही प्रतिक्षा आता संपली असून आज दहावीचा निकाल बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर mahresult.nic.in वर जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता प्रवेशप्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांची धांदल सुरु होईल. प्रवेशप्रक्रीयेसाठी विद्यार्थ्यांकडे आवश्यक सरकारी कागदपत्रं असणं गरजेचं आहे. 11 वी प्रवेशप्रक्रीयेदरम्यान आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रांची जुळवाजुळव करणे गरजेचे आहे. तर जाणून घ्या कोणती आहेत ती कागदपत्रं आणि ती कुठे मिळवाल? (10 जूनच्या आधी महाराष्ट्र बोर्ड 10 वी चा निकाल लागण्याची शक्यता, mahresult.nic.in या वेबसाईटवर लागणार निकाल)

उत्पन्नाचा दाखला

फी मध्ये सवलत मिळवण्यासाठी तुम्हांला उत्पन्नाचा दाखला सादर करणं आवश्यक आहे. त्यासाठी पालकांचे उत्पन्न किती आहे? याचा दाखला सरकारी कार्यालयातून घेणं आवश्यक आहे.

जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी प्रमाणपत्र

विशिष्ट जातीच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या जाती निष्कर्षानुसार ठराविक कोट्यातून आरक्षण दिले जाते. मात्र त्यासाठी विद्यार्थ्यांना सरकारी कार्यालयातून जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र हे दोन्ही दाखल करणं आवश्यक असतं. barti.maharashtra.gov.in ला भेट दिल्यास तुम्हांला अधिक माहिती मिळू शकते. वैध जात प्रमाणपत्र आणि जात पडताळणी पत्र यानंतरच त्यांना जातीच्या आधारे आरक्षणाचा फायदा घेऊन अ‍ॅडमिशन घेता येते.

नॉन क्रिमी लेयर सर्टिफिकेट

ओबीसी (इतर मागासवर्गीय ) प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातीसोबतच आर्थिक सवलत मिळवण्यासाठी नॉन क्रिमी लेयर सर्टीफिकेट सादर करणं आवश्यक असते. पालक Class I / Class A सरकारी कर्मचारी नसल्यास तसेच त्यांचे एकूण उत्पन्न 8 लाख रूपयांपेक्षा कमी असल्यास त्यांना नॉन क्रिमी लेयर सर्टीफिकेट दिले जाते. त्याच्या आधारे फीमध्ये सवलत मिळते.

डोमेसाईल सर्टिफिकेट

डोमेसाईल सर्टिफिकेट च्या आधारे तुम्ही राष्ट्रीयत्त्वाचा दाखला सादर करता. तुम्ही विशिष्ट राज्यामध्ये 15 वर्ष राहत असल्याचा दाखला डोमेसाईल सर्टिफिकेटच्या माध्यमातून सादर करता.

प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्र तहसीलदार कार्यालय, सेतू ऑफिसमधून मिळू शकतात. अधिक माहितीसाठी  http://mr.vikaspedia.in  येथे भेट द्या.