Eknath Shinde , Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) सरकारच्या कारकीर्दीतील पहिल्याच अधिवेशनात नामुष्कीला सामोरे जावे लागले आहे. विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले असून, अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी विचारलेला पहिलाच प्रश्न राज्य सरकारने राखीव ठेवला आहे. विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पालघर जिल्ह्यातील हत्तीरोग (Elephantiasis प्रतिबंध उपाययोजनांसंदर्भात प्रश्न विचालला होता. यावर आरोग्यमंत्री म्हणून तानाजी सावंत यांनी उत्तर देणे अपेक्षीत होते. मात्र, अजित पवार यांच्या प्रश्नाला आरोग्यमंत्र्यांना उत्तरच देता आले नाही. परिणामी, पहिलाच प्रश्न राखीव ठेवावा लागला.

अजित पवार यांनी विचारलेल्या प्रश्नाला राज्यसरकार आता सोमवारी उत्तर देणार आहे. अजित पवार यांनी विधिमंडळात नेमका प्रश्न विचारला होता. पालघर जिल्ह्यात वाढलेला हत्तीरोगाचा प्रादुर्भाव त्यावर होणारी उपाययोजना, यंत्रणेवर होणारा अपेक्षीत खर्च, मंजूर खर्च, अधिकारी, कर्मचारी यांची संख्या, या रोगाच्या नियंत्रणासाठी आवश्यक असलेली अधिकच्या पदांची, कर्मचाऱ्यांची संख्या याशिवा हत्तीरोग निवारणासाठी मंजूर झालेल्या एकूण निधीपैकी खर्च झालेल्या निधीचा आकडा अशा सर्व प्रश्नांची माहिती अजित पवार यांनी विधमंडळात सरकारला मागितली होती. यावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे उत्तर नव्हते. त्यामुळे सरकारला हा प्रश्न राखीव ठेवावा लागला.  (हेही वाचा: शिंदे गटातील आठ मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांची जबाबदारी, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? घ्या जाणून)

दरम्यान, ऑक्टोबर 2021 मध्ये पालघर जिल्ह्यात एक सर्व्हेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात पुढे आले की, जिल्ह्यातील 80 बालकांना हत्तीरोगाची लागण झाली आहे. प्रामुख्याने यातील 29 बालके ही डहाणू, विक्रमगड, तलासरी तालुक्यातील होती. अजित पवार यांनी आपल्या प्रश्नादरम्यना सांगितले की, डासांपासून हत्तीरोगाची लागण बालकांना होते. डासांमुळे लोकांपर्यंत पसरणारा हा रोग भयानक आहे. या रोगामुळे मानवी शरीर विद्रुप होते. व्यक्ती अकार्यक्षण आणि स्थूल होतो. त्यामुळे या रोगावर वेळीच उपाययोजना करण्यासाठी सरकार काय पावले उचलते आहे याबाबतही अजित पवार यांनी प्रश्नाच्या माध्यमातून विचारणा केली.