Maharashtra Ministers Portfolio: शिंदे गटातील आठ मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांची जबाबदारी, कोणत्या मंत्र्याकडे कोणतं खातं? घ्या जाणून
CM Eknath Shinde and Dy CM Devendra Fadnavis | (Photo Credit - Twitter)

शिंदे गटातील आठ मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी या आठ मंत्र्यांवर देण्यात आली आहे. दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 जणांचं हे मंत्रिमंडळ आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील आठ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. (हे देखील वाचा: '50 खोके एकदम ओक्के' CM Eknath Shinde, DyCM Devendra Fadnavis विधिमंडळात पायर्‍यांजवळ येताच विरोधकांची घोषणाबाजी (Watch Video)

मंत्री सध्याचं खातं अतिरिक्त खातं
उदय सामंत उद्योग माहिती आणि तंत्रज्ञान
शंभूराज देसाई  राज्य उत्पादन शुल्क  परिवहन
दादा भुसे बंदरे व खनिकर्म पणन
संजय राठोड अन्न व औषध प्रशासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
तानाजी सावंत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मृद व जलसंधारण
अब्दुल सत्तार कृषी आपत्ती व्यवस्थापन
दीपक केसरकर शालेय शिक्षण व मराठी भाषा पर्यावरण आणि वातावरणीय बदल
संदीपान भुमरे रोजगार हमी योजना व फलोत्पादन अल्पसंख्याक व औकाफ

महत्त्वाची खाती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे

खाते वाटपात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे खाती जास्त आली असली तरी महत्त्वाची खाती ही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आल्याचं दिसतं. मुख्यमंत्र्यांकडे सामान्य प्रशासन तसंच नगरविकास खात यासह इतर महत्त्वाची खाती आहेत. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, अर्थ, ऊर्जा तसंच जलसंपदा मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली आहे