Maharashtra Assembly Elections 2019: विधानसभेसाठी शरद पवार यांचा प्रचार दौरा; 'या' ठिकाणी धडाडणार तोफा
Sharad Pawar | (Photo credit : Facebook)

महाराष्ट्रामधील प्रत्येक पक्षासाठीच ही विधानसभा निवडणूक (Assembly Elections 2019) फार महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकीनंतर राज्यात तोडफोडीचे राजकारण होऊन अनेक नेत्यांनी पक्षांतर केले. याचा सर्वात जास्त फटका बसला तो राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP). ऐन निवडणुकीच्या तोंडावर एनसीपीच्या अनेक नेत्यांनी साथ सोडून भाजप अथवा शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आता उरलेल्या नेत्यांसह राष्ट्रवादी मैदानात उभी आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार प्रचारासाठी सज्ज झाले आहे. उद्या पासून पुढचे तीन दिवस शरद पवार यांचा प्रचाराचा झंझावत सुरु होत आहे.

शरद पवार यांचा पहिला प्रचार दौरा उस्मानाबाद, ठाणे, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये असणार आहे. दुसऱ्या टप्प्यात उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात सभा पार पडतील. 8 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबरपर्यत असा तीन दिवसीय हा दौरा असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली.

असा असेल सभांचा कार्यक्रम -

8 ऑक्टोबर - अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर येथे रोजी सकाळी 11.30 वाजता

8 ऑक्टोबर - पारोळ्यात संध्याकाळी 5 वाजता

9 ऑक्टोबर - विदर्भात अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे सकाळी 11.30 वाजता

9 ऑक्टोबर - वाशिम जिल्ह्यातील मानोरा-कारंजा येथे सायंकाळी 4 वाजता

10 ऑक्टोबर - हिंगणघाट येथे सकाळी 10.30 वाजता

10 ऑक्टोबर - बुटीबोरी-हिंगणा 3 वाजता

10 ऑक्टोबर - काटोल 5 वाजता