Narendra Modi In Satara | (Photo credits: ANI)

Maharashtra Assembly Elections 2019: सातारा (Satara) ही माझी गुरुभूमी (Guru Bhumi ) आहे. सातारा जिल्ह्यातील मान-खाटाव इथले लक्ष्मणरावजी इनामदार हे माझे गुरु आहेत. आम्ही गुजरातमध्ये त्यांना वकीलसाहेब म्हणतो. माझ्या शिक्षणाची, पालनपोषणाची जबाबदारी त्यांनी घेतली होती. त्यामुळे एका अर्थाने सातारा ही माझी गुरुभूमी आहे. त्याचसोबत तिर्थयात्राही आहे, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)  यांनी साताऱ्याशी असलेले नाते सांगितले. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजप-शिवसेना युती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बोलत होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या सभेत नेहमीप्रमाणे याहीसभेत विरोधकांवर जोरदार टीकास्त्र सोडले. महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यांमध्ये भाजपच जिंकणार असा विश्वास व्यक्त करत पंतप्रधान नरेंदिर मोदी म्हणाले, भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या विरोधात निवडणूकीत विरोधकांकडून  उभे राहण्यास कोणीही तयार नव्हते. त्यामुळे उभे कोण राहायचे याबाबत एकमेकांची नावे पुढे केली जात होती. ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे होती. परंतू, शरद पवार यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना उभे राहण्याचा आग्रह केला. मात्र, त्यांनी नकार देताच त्यांनी दुसरा उमेदवार पुढे केला. शरद पवार हे अत्यंत चलाख राजकारणी आहेत. बदलत्या हवेचा अंदाज त्यांना बरोबर येतो, असा टोलाही मोदींनी लगावला. (हेही वाचा, विधानसभा निवडणुकीत जतना भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून देईल: नरेंद्र मोदी)

एएनआय ट्विट

फोडा आणि राज्य करा हीच आजवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची रणनीती राहिली आहे असा आरोप करत युती सरकार सत्तेवर येताच घोटाळ्यांच्या विविध फाईल्स पुढे आल्या. सिंचन घोटाळा असो की, इतर कोणताही घोटाला चौकशी करुन दोशींना तुरुंगात टाकण्याचे काम सुरु झाले. महायुतीच्या सरकारने रखडलेल्या अनेक योजना पूर्ण केल्या, असेही नरेंद्र मोदी यांनी सांगितले.