विधानसभा निवडणुकीत जनता भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून देईल: नरेंद्र मोदी
Prime Minister Narendra Modi | (Photo credits: ANI)

Maharashtra Assembly Elections 2019: वैजनाथाच्या पवित्र भूमित आणि माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांच्या कर्मभूमीत मी आलो आहे. मराठवाड्यातील सर्व बंधू भगिनिंना माझा नमस्कार. बाबा वैजनात आणि जनता यांच्या रुपात दोन परमेश्वरांचे दर्शन घेण्याचा योग परळीत आला. मराठवाडा ही संतांची भूमी आहे, या शब्दांत उपस्थितांच्या भावनेला हात घालत या निवडणुकीत जनता भाजपला ऐतिहासिक विजय मिळवून देईल असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी व्यक्त केला. भाजप-शिवसेना युती उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पंतप्रधान मोदी बीड (Beed) जिल्ह्यातील  परळी ( Parli)  येथे बोलत होते. या वेळी महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे, भाजप खासदार, उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

विरोधक हताश आणि निराश

परळी येथील सभेत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. सरकारने गेल्या पाच वर्षांत जे काम केले त्या कामामुळेच जनता भाजपसोबत आहे. सरकारच्या प्रत्येक निर्णयाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसवाले विरोध करतात. विरोधक हे आता हताश आणि निराश झाले आहेत. विराधोत असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व नेते स्वार्थी आहेत. त्याउलट भाजपमधील प्रत्येक कार्यकर्ता हा जनतेसाठी काम करतो, असे मोदी म्हणाले.

एएनआय ट्विट

जनता भाजपला ऐतिहासीक विजय मिळवून देईल

या निवडणुकीत जनता भाजपला ऐतिहासीक विजय मिळवून देईल असा विश्वास व्यक्त करताना मोदी म्हणाले, सरकारचे काम पाहून लोक भाजपसोबत येत आहेत. जम्मू काश्मीर मधून कलम 370 हटवल्याने हिंदू-मुस्लिम, दलित आणि महिलांना न्याय मिळाला. देशाच्या एकतेतही विरोधकांना हिंदू-मुस्लिम दिसते. देशाच्या एकते विरोधात बोलणाऱ्यांना धडा शिकवा असे अवाहनही मोदींनी या वेळी केले.