
NCP Candidates Final List: महाराष्ट्रात होणाऱ्या विधानसभा निवडणूका अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. तर आज विधानसभा निवडणूकीसाठी तिकिट देण्यात आलेल्या उमेदवारांना अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यानंतर आता राजकीय पक्षांकडून त्यांनी कोणत्या उमेदवाराता निवडणूकीसाठी रिंगणात उतरवले आहे हे स्पष्ट झाले आहे. याच पार्श्वभुमीवर राष्ट्रवादी पक्षाने (NCP) ही आपल्या संपूर्ण उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी पक्षाकडून जुन्या नेत्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे.
राष्ट्रवादीने येवला येथून छगन भुजबळ, इस्लामपूरमधून जयंत पाटील यांना तिकिट दिले आहे. तर पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांना बारामती व नातू रोहीत पवार यांना कर्जत जामखेडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. विधानसभा निवडणूकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने समोपचाराने चर्चा करुन जागा वाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला होता. यामध्ये दोन्ही पक्ष प्रत्येक प्रत्येकी 125 जागा मिळणार आहे. तर आघाडीतील 11 मित्रपक्षांना 38 जागा देण्याचा निर्णयावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब करण्यात आले.
राष्ट्रवादी पक्षाची उमेदवार यादी:




विधानसभा निवडणूक प्रक्रियेत महाराष्ट्रात 8 कोटी 94 लाख मतदार मतदान करतील. महाराष्ट्रात 288 मतारसंघासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडेल. 27 सप्टेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येतील. 4 ऑक्टोबर हा निवडणूक अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम दिवस असेल. 7 ऑक्टोबर पर्यंत दाखल केलेले आणि छाननीमध्ये टिकलेले उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. त्यानंतर 21 ऑक्टोबर या दिवशी प्रत्यक्ष मतदान तर, 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी पार पडणार आहे.