आमचं ठरलयं! भावी मुख्यमंत्री महायुतीचाच होणार देवेंद्र फडणवीस यांचा दावा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Photo Credits-ANI)

Maharashtra Assembly Elections 2019: महाराष्ट्रात आज विधानसभा निवडणूकीचे निकाल हळूहळू स्पष्ट होत आहेत. आज पार्श्वभुमीवर आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  (Devendra Fadnavis) यांनी पत्रकार परिषद घेत भाजपला (BJP) महाराष्ट्रात जनतेकडून मिळालेल्या पाठिंब्याचे आभार मानले. तसेच महाराष्ट्राचा भावी मुख्यमंत्री हा महायुतीचाच होणार असल्याचा निर्णय दिला आहे. मात्र आताची वेळ ही विजयाचा आनंद साजरा करण्याची आहे. त्याचसोबत महायुतीचे घटकपक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.

2019 च्या विधानसभा निवडणूकीसाठी भाजप-शिवसेना पक्षाने एकत्रित निवडणूक लढण्याचा विचार केला. त्यापैकी भाजपने महाराष्ट्रातील 288 जागांपैकी 164 जागांवर निवडणूक लढवली पण त्यांना 26 टक्के मत मिळाल्याचे फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे. यंदाचा भाजपचा स्ट्राईक रेट 70 टक्के असून हा पक्षाच्या कार्यकाळातील एक ऐतिहासिक बाब आहे. पण परळी मधून पंकजा मुंडे आणि सातार येथून उदयनराजे यांचा पराभव हा धक्कादायक असल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. या पराभवावर आता पक्षाकडून अधिक विश्लेषण सुद्धा करण्यात येणार आहे. त्याचसोबत भाजप-शिवसेना पक्षात मोठ्या प्रमाणात बंडखोरी करण्यात आल्याने त्याचा मतदानावर परिणाम झाला आहे. काही ठिकाणी कमी जास्त जागा झाल्या पण उत्तम कामगिरी केली आहे.(महाराष्ट्रात मताचा कौल युतीला पण तरीही सत्ता स्थापनासाठी हे 3 पर्याय)

ANI Tweet:

>>येथे पहा भाजपच्या विजयी उमेदवारांची यादी

विधानसभा निवडणूकीत जनतेने सर्वात मोठे समर्थन भाजपला मिळाले असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. त्याचसोबत येत्या पुढील काळात विरोधी पक्ष सक्षमतेने काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. तसेच अपक्ष आणि इतरमधील 15 जण महायुतीसोबत येणार असल्याचे फडणवीस यांनी खुलासा केला आहे.