महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी (Maharashtra Assembly Election Results 2024) आज (23 नोव्हेंबर) पार पडत आहे. सुरुवातीचे कल हाती आल्यानंतर आता हळूहळू निकाल जाहीर होऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार भारतीय जतना पक्षाने जोरदार मुसंडी मारली असून, देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन (Girish Mahajan) आणि कालीदास कोळंबकर (Kalidas Kolambkar) विजयी झाले आहेत. अजित पवार यांच्या राष्ट्रावादी काँग्रेस पक्षानेही खाते खोलले आहे. रायगड जिल्ह्यातून आदिती तटकरे (Aditi Tatkare) विजयी झाल्या आहेत.
कलीदास कोळंबकर यांची तिसऱ्यांदा हॅटट्रीक
अनेकदा हॅटट्रीकबाबत बोलले जाते. पण कालीदास कोळंबकर यांनी हॅटट्रीकची हॅटट्रीक केली आहे. ते सलग नवव्यांदा विजयी झाले आहेत.
देवेंद्र फडणवीस पुन्हा चर्चेत
भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार देवेंद्र फडणवीस यांचाही विजय झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाच्या स्पर्धेत असलेल्या फडणवीस यांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
गिरीश महाजन
भारतीय जनता पक्षाचे नेते आणि देवेंद्र फडणवीस यांचे कट्टर समर्थक गिरीश महाजन यांचाही विजय झाला आहे.
मंगलप्रभात लोढा: मलबार हील विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार मंगल प्रभात लोढा यांचा या निवडणुकीत विजय झाला आहे. लोढा हे महायुती सरकारमधील मंत्री आहेत.
राधाकृष्ण विखे पाटील: अनेक वर्षे काँग्रेसमध्ये काढल्यावर पाठिमागच्या काही वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेशकर्ते झालेले आणि देवेंद्र फडणवीस यांचे समर्थक मानले जाणारे राधाकृष्ण विखे पाटील हे देखील विजयी झाले आहेत.
रावि राणा: राष्ट्रीय युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रवि राणा यांचा विजय झाला आहे. त्यांनी बडणेरा विधानसभा मतदारसंघातून विजय मिळवला आहे.
अजित पवार यांच्या पक्षाने खाते उघडले
लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना भोपळा मिळता मिळता ज्यांच्यामुळे वाचला त्या खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आणि महायुती सरकारमधील विद्यमान मंत्री आदिती तटकरे यांचा विजय झाला आहे. त्यांच्या रुपात अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने खाते उघडले आहे.
राज्यातील एकूण 288 जागांसाठी विधानसभा निवडणूक पार पडली. या निवडणुकीत जवळपास 4 हजारांहून अधिक उमेदवार मैदानात होते. यातील काही नोंदणीकृत राजकीय पक्षांचे होते तर उर्वरीत संस्था, संघटना अथवा अपक्ष होते. राज्यातील कमालीची बदललेली राजकीय स्थिती आणि सामाजिक प्रश्न या पार्श्वभूमीवर ही निवडणूक प्रचंड महत्त्वाची होती. या निवडणुकीचा निकाल नेमका काय लागतो, राज्यातील जनता नेमकी कोणाच्या हाती सत्तेची चावी देते याबाबत प्रचंड उत्सुकता होती. ही उत्सुकता संपून वास्तव हळूहळू पुढे येऊ लागले आहे.