Maharashtra Assembly Election Result 2019: निवडणुकीपूर्वी पक्षांतर केलेल्या उमेदवारांना तारेल का नवा पक्ष ? दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (File Image)

राज्यात महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुका (Maharashtra Assembly Election) पार पडल्या. आज या निवडणुकांचे निकाल हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील जनतेने कोणाला कौल दिला आहे? राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण होणार? या प्रश्नांची उत्तरे आज मिळणार आहेत. अशात महाराष्ट्राला उत्सुकता आहे ती पक्षांतर झालेल्या उमेदवारांची. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिगज्जांनी पक्षांतर केले होते, नवीन पक्षंनी मोठ्या विश्वासाने त्यांना तिकीटही दिले. आता या उमेदवारांना नवीन पक्ष तारेल का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 145 जागा मिळवणे आवश्यक असते. भाजपने तोडफोडीचे राजकारण करत हा आकडा गाठावा यासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. त्यामुळे आज अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पक्षांतर केलेल्या या उमेदवारांना दिले नवीन पक्षाने तिकीट -

राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये गेलेले उमेदवार -

बबनराव पाचपुते - श्रीगोंदा, अहमदनगर

वैभव पिचड -  अकोले, अहमदनगर

राणा जगजितसिंह पाटील - तुळजापूर, उस्मानाबाद (मतदारसंघात बदल)

नमिता मुंदडा - (आमदार नाही) - केज, बीड

काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले उमेदवार

जयकुमार गोरे - माण, सातारा

कालिदास कोळंबकर - वडाळा, मुंबई

राधाकृष्ण विखे पाटील -  शिर्डी, अहमदनगर

अमल महाडिक - कोल्हापूर दक्षिण, कोल्हापूर

नितेश राणे - कणकवली, सिंधुदुर्ग

काशिराम पावरा - शिरपूर, धुळे

गोपालदास अग्रवाल - गोंदिया, गोंदिया

हर्षवर्धन पाटील - माजी आमदार, इंदापूर, पुणे

मदन भोसले - माजी आमदार, वाई, सातारा

रवीशेठ पाटील - पेण, रायगड

भरत गावित - नवापूर, नंदुरबार

राष्ट्रवादीमधून शिवसेनेमध्ये गेलेले उमेदवार

पांडुरंग बरोरा - शहापूर, ठाणे

भास्कर जाधव - गुहागर, रत्नागिरी

जयदत्त क्षीरसागर - बीड, बीड

रश्मी बागल - (आमदार नाही) - करमाळा, सोलापूर

शेखर गोरे - (आमदार नाही) माण, सातारा

काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये गेलेले उमेदवार

अब्दुल सत्तार -  सिल्लोड, औरंगाबाद

भाऊसाहेब कांबळे - श्रीरामपूर, अहमदनगर

निर्मला गावित - इगतपुरी, नाशिक

दिलीप माने - माजी आमदार - सोलापूर मध्य, सोलापूर

विलास तरे - बविआ ते शिवसेना - बोईसर, पालघर

शरद सोनावणे - मनसे ते शिवसेना - जुन्नर, पुणे

भाजपमधून कॉंग्रेसमध्ये गेलेले उमेदवार -

आशिष देशमुख - नागपूर दक्षिण पश्चिम

उदेसिंह पाडवी - शहादा, नंदुरबार

इतर पक्षांतर -

बाळासाहेब सानप - भाजप ते राष्ट्रवादी - नाशिक पूर्व, नाशिक

भारत भालके - काँग्रेस ते राष्ट्रवादी - पंढरपूर, सोलापूर

दरम्यान, राज्यात यंदा मतदानाचा आकडा घसरला आहे. विधानसभेसाठी राज्यात 288 विधानसभा मतदारसंघात सरासरी 61.13 टक्के मतदान झाले आहे. सातारा लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीसाठी 67.15 टक्के मतदान झाले आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेत बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 145 जागा मिळवणे आवश्यक असते. एक्झिट पोलच्या निकालानुसार राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार असल्याचे दिसत आहे. आता नक्की निकाल कोणाच्या बाजूने लागतो हे काही तासांतच स्पष्ट होईल. 1967 नंतर महाराष्ट्राच्या राजकारणातील ही पहिलीच वेळ असेल जेव्हा, पाच वर्षांच्या राजवटीनंतर मुख्यमंत्री सलग दुसऱ्यांदा बहुमताने सत्तेत पुनरागमन करतील. एक्झिट पोलच्या निकालानुसार युतीला -194-166 जागा, कॉंग्रेस-राष्ट्रवादीला 90-72  आणि अन्य पक्षांना 22-34 जागा मिळतील.