Maharashtra Assembly Election 2024: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election) कार्यक्रम काल जाहीर झाला. राज्यात 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान पार पडणार असून, 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेने राज्यात कालपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे असून 288 जागांवर मतदान होणार आहे. मंगळवारपर्यंत राज्यात 9.63 कोटी नोंदणीकृत मतदार आहेत जे नवीन सरकार निवडतील. यामध्ये 4.97 कोटी पुरुष आणि 4.66 कोटी महिला मतदारांचा समावेश आहे. मात्र, राज्य निवडणूक आयोगाने (SEC) बुधवारी सांगितले की, ज्या पात्र मतदारांनी अद्याप आपली नोंदणी केलेली नाही, त्यांच्याकडे 19 ऑक्टोबर रोजी सकाळी 12 वाजेपर्यंत वेळ आहे.
निवडणूक सांगितले की, नागरिक संबंधित विधानसभांमधील निवडणूक आयोगाच्या कार्यालयात फॉर्म भरू शकतात किंवा ऑनलाइन मतदार नोंदणीसाठी https://voters.eci.gov.in/ या वेबसाइटला भेट देऊ शकतात. नागरिक कोणत्याही माहितीसाठी टोल फ्री हेल्पलाइन नंबर 1950 वर कॉल करू शकतात. नवीन मतदार नोंदणी 'व्होटर हेल्पलाइन ॲप'वरही करता येते आणि नोंदणीकृत यादीही तपासता येते.
Maharashtra Assembly Election 2024:
Be a vigilant and aware #Voter! #AssemblyElections2024
✅The Voter Guide - #VHA App
✅Report electoral malpractices - #cVigil App
✅Informed Voting - #KYC App
✅At Candidate’s Service - #Suvidha Portal
#AssemblyElections2024 #Elections2024 pic.twitter.com/SoJsDoy2WK
— Election Commission of India (@ECISVEEP) October 15, 2024
निवडणूक आयोग मतदारांना, म्हणजे नुकतेच 18 वर्षे वय पूर्ण केलेल्या नागरिकांना निवडणूक आयोगाकडे नोंदणी करण्यासाठी आणि मतदानाचा हक्क बजावण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. 28 सप्टेंबरपर्यंत महाराष्ट्रात 19.48 लाख नवीन मतदार होते, जे 19 ऑक्टोबरपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे. तसेच 6 लाख 2 हजार दिव्यांग मतदार व 12 लाख 5 हजार ज्येष्ठ नागरिक मतदार यावेळी आपला मतदानाचा हक्क बजावतील. राज्यभरात एकूण 1 लाख 186 मतदान केंद्रे उभारण्यात येणार आहेत. यापैकी 42 हजार 604 मतदान केंद्रे शहरी भागात तर 57 हजार 582 मतदान केंद्रे ग्रामीण भागात आहेत. (हेही वाचा: Pune: पुण्यात अजित पवारांना मोठा धक्का; Deepak Mankar यांना आमदारकी नाकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या 600 हून अधिक कार्यकर्त्यांनी दिला राजीनामा)
दरम्यान, मतदान केंद्राची माहितीही आता ऑनलाइन पाहता येते. ई-ईपीआयसी हे नवीन डिजिटल मतदार ओळखपत्र डाउनलोड करून सुरक्षित ठेवण्याची सुविधा मिळाली असून, निवडणूक आयोगाने माहिती दिली की, मतदार 'Cvigil ॲप'च्या मदतीने आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी दाखल करू शकतात आणि या ॲपवर केलेल्या तक्रारींचे 100 मिनिटांत निराकरण केले जाते.