मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) सरकारतर्फे थेट सरपंच निवडणुक रद्द करून पुन्हा एकदा ग्रामपंचायतीमधून निवडणूक घेण्याचा प्रस्ताव राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांनी फेटाळवून लावल्यांनंतर आता अखेरीस राज्यभरातील 19 जिल्ह्यांमधील 1 हजार 570 ग्रामपंचायतीत सरपंच व सदस्यपदांच्या निवडणुकांची तारीख ठरवण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, थेट सरपंच व सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 29 मार्च रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. मतमोजणी 30 मार्च रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे. गडचिरोली जिल्ह्यासाठी मतदानाची वेळ सकाळी 7,30 ते दुपारी 3 वाजेपर्यंत असणार आहे. ग्रामपंचायत मार्फत सरपंच निवडीच्या निर्णयाला राज्यपाल कोश्यारी यांच्याकडून ब्रेक; उद्धव ठाकरे सरकारला धक्का
राज्यपालांना सदस्यांधून सरपंच निवडीचा अध्यादेश फेटाळला असल्याने आता थेट सरपंचपदासाठी निवडणूक प्रक्रिया राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रम देखील जाहीर झाला आहे. एप्रिल ते जून 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या याचबरोबर नव्याने स्थापित होणाऱ्या ग्रापंचायतींसाठी ही निडणूक होत आहे.तर, उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख 18 मार्च आहे. शिवाय याच दिवशी निवडणूक चिन्हाचे देखील वाटप होणार आहे.
दरम्यान,सद्य घडीला ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या ही 1570 इतकी असून सर्वाधिक ग्रामपंचायत या अमरावती जिल्ह्यात त्यापाठोपाठ यवतमाळ, गडचिरोली, आणि नाशिक याठिकाणी आहेत. या निवडणुकीसाठीचे उमेदवारी अर्ज 6 ते 13 मार्च या कालावधीत स्वीकरले जाणार आहेत.