Exam Result | (File Image)

Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education कडून आज (20 ऑक्टोबर) इयत्ता 10वी आणि 12वीच्या पुरवणी परीक्षांचे निकाल ( Supplementary Exam Result) जाहीर केले जाणार आहेत. हा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर होईल. दरम्यान बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर हा निकाल जाहीर केला जाणार आहे. काल राज्याच्या शालेयमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे.यंदा 12वीची पुरवणी परीक्षा 16 सप्टेंबर ते 12 ऑक्टोबर दरम्यान पार पडली होती. तर दहावीची परीक्षा 22सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान पार पडली होती. या परीक्षांचा नऊ विभागीय मंडळांचा निकाल जाहीर होणार आहे.

कसा पहाल महाराष्ट्र राज्य बोर्डाच्या 10वी, 12वी पुरवणी परीक्षेचा निकाल?

  • बोर्डाची अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in ला भेट द्या.
  • स्क्रिन वर दिसणार्‍या 10th, 12th supplementary exam result link वर क्लिक करा.
  • नंतर तुम्हांला रोल नंबर (roll number), आईचं नाव ही माहिती भरावी लागेल.
  • तुमच्या स्क्रीन वर निकाल दिसेल. या निकालाला डाऊनलोड करून प्रिंट आऊट देखील काढता येऊ शकते.

शैक्षणिक वर्ष 2021 मध्ये प्रथम नोंदणी करून परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणूक सुधारण्यासाठी श्रेणी, गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत परीक्षेला पुन्हा बसण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यानुसार सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 च्या 10वी,12वी परीक्षेस सर्व विषय घेऊन प्रथमच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी तरतुदीच्या अधीन राहून पुढील सलगच्या दोन संधी उपलब्ध राहतात. 2021 मधील परीक्षेसाठी नोव्हेंबर-डिसेंबर 2020, 2021अथवा सप्टेंबर-ऑक्टोबर 2021 मधील परीक्षेमध्ये एकाच वेळी सर्व विषय घेऊन उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच श्रेणीसधार योजनेतंर्गत (Class Improvement Scheme) आवेदनपत्र भरुन परीक्षेला बसता येणार. त्यामुळे त्यापूर्वीच असे उत्तीर्ण विद्यार्थी अथवा कोणताही पुनर्परिक्षार्थी विद्यार्थी यांना श्रेणीसुधार योजनेतंर्गत परीक्षेस प्रविष्ट होता येणार नाही. असे बोर्डाने स्पष्ट केले आहे.