Maharashtra Supplementary Exam Results: इयत्ता 10, 12 वी पुरवणी परीक्षेचा निकाल 20 ऑक्टोबरला होणार जाहीर, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची माहिती
Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (Maharashtra State Board of Secondary and Higher Secondary Education) द्वारा घेतल्या जाणाऱ्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल (Supplementary Exam Results) येत्या बुधवारी म्हणजेच 20 ऑक्टोबर 2021 ला दुपारी 1 वाजता जाहीर होणार आहे. हा निकाल http://mahresult.nic.in या संकेतस्थळावर जाहीर होणार आहे, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री प्रा.वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी दिली आहे. राज्यातून इयत्ता दहावीच्या 42 हजार 634 विद्यार्थ्यांनी 355 केंद्रांवर, तर बारावीच्या 67 हजार 603 विद्यार्थ्यांनी 317 केंद्रांवर परीक्षा दिली. दोन्ही इयत्तांच्या परीक्षा लेखी स्वरूपात पार पडल्या होत्या. त्यासाठीचे वेळापत्रकही राज्य मंडळाकडून जाहीर करण्यात आले होते. या वेळापत्रकानुसारच या परीक्षा घेण्यात आल्या.

राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावी परीक्षा यंदा कोरोना व्हायरस महामारीमुळे घेण्यात आल्या नाहीत. अंतर्गत मुल्यमापनाद्वारेच निकाल जाहीर करण्यात आला. दरम्यान, वेगळ्या पद्धतीने मुल्यमापण करुन निकाल जाहीर करण्यात आला असला तरीही काही विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी पुरवणी परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. राज्य मंडळाने दिलेल्या वेळापत्रकानुसार, दहावीची परीक्षा 22सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर या कालावधीत होईल. त्याचप्रमाणे बारावीची परीक्षा 16 सप्टेंबर ते 11ऑक्टोबर या कालावधीत पार पडल्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल गनद्वारे तपासणी, सॅनिटायझर, मास्कचा वापर आदी गोष्टींचा वापर परीक्षा केंद्रांवर कटाक्षाणे करण्यात आला होता. (हेही वाचा, CTET Online Application 2021 Date: सीबीएसई कडून CTET च्या रजिस्ट्रेशन साठी 25 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ)

ट्विट

प्रतिवर्षी पूरवणी परीक्षा जुलै-ऑगस्टमध्ये होते. मात्र, कोरोना व्हायरस महामारीमुळे या परीक्षा तीन महिन्यांनी पुढे लांबल्या. परीक्षा उशीरा घेतल्या तरीही कोरोनाचे संकट कायम होते. त्यामुळे परीक्षा केंद्रावर थर्मल गन, सॅनिटायझरसह पर्यवेक्षक, केंद्रप्रमुखांना मास्क खरेदी, थर्मल गनद्वारे तपासणी, सॅनिटायझर, मास्कचा वापर आदी गोष्टींचा कटाक्षाने वापर करण्यात आला.