Mahaparinirvan Diwas: चैत्यभूमीवर गोंधळ, दोन गटांमध्ये वाद; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे परिस्थिती नियंत्रणात
Chaityabhoomi Dadar (File Image)

महापरिनिर्वाण दिनानिमित्त (6th December Mahaparinirvan Din) चैत्यभूमी दादर (Dadar Chaityabhoomi) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr Babasaheb Ambedkar) यांना अभिवादन करण्यासाठी भीमसागर उसळला आहे. भीम अनुयायी मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत. कोरोना व्हयरस महामारी संकट अद्याप दुर झाले नाही. या पार्श्वभूमीवर कोरोना नियमांचे पालन कटाक्षाणे केले जात आहे. दरम्यान, कोरोना नियमांचे पालन करुन सकाळपासून रांगेत दर्शन झाले. मात्र, दुपारच्या वेळी भीम अनुयायांना दर्शनास सोडण्यावरुन दोन गटांमध्ये वाद झाला. त्यातून काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यामुळे पुढील अधिकचा गोंधळ टळला.

प्राप्त माहितीनुसार, आनंदराज आंबेडकर यांचे काही कार्यकर्ते दुपारच्या सुमारास चैत्यभूमी दादर येते एकवटले होते. या वेळी कार्यकर्त्यांच्या या गटाने पोलिसांना सहकार्य करण्याचे अश्वासन दिले होते. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी आद सोडण्यावरुन एका गटाने आग्रह धरला. यातून वाद निर्माण झाला. आणि दोन गट एकमेकांना भीडले. सर्वांना दर्शनास जाऊ दिले जात आहे. मात्र, आमच्या वेळेसच गाईडलाईन्स का दाखवल्या जात आहेत? काही जणांनाच का प्रवेश दिला जात आहे? असा सवाल उपस्थित केला. काहींनी शांततेत दर्शन घेऊ दिले जावे, असेही म्हटले. (हेही वाचा, Mahaparinirvan Diwas 2021: समीर वानखेडे महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमीवर दाखल, भीमशक्ती रिपब्लिकन सेनेकडून वानखेडेंच्या उपस्थितीवर आक्षेप )

एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनीही सकाळी चैत्यभूमी दादर येथे जाऊन अभीवानद केले. त्यांच्या विरोधातही काही नागरिकांनी घोषणाबाजी केली. या वेळी वानखेडे यांचे समर्थक आणि विरोधक यांच्यात काही काळ हलकीशी वादावादी झाली. वानखेडे समर्थक आणि विरोधक एकमेकांसमोर आल्यानेही काही काळ गोंधलाचे वातावरण निर्माण झाले होते. काहीचे म्हणने होते की, वानखेडे यांना चैत्यभूमीवर येण्याचा अधिकार नाही. भीमशक्ती रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष अनिल दगडू कांबळे यांनी हा आक्षेप घेत वानकेडे यांना विरोध केला.