एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) आज महापरिनिर्वान दिनानिमित्त चैत्यभुमिवर दाखल झाले यावेळी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांना (DR Babasaheb Ambedkar) अभिवादन केलं. मात्र यावेळी तेथून बाहेर जात असताना त्यांच्या विरोधात आणि समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याने वाद निर्माण झाला. भीमशक्ती रिपब्लिकन सेनेने समीर वानखेडे यांना आत्ताच चैत्यभूमीवर यावंसं का वाटलं असा सवाल उपस्थित केला तसेच त्यांना येथे येण्याचा नैतिक अधिकार नाही अशी भुमिका भीमशक्ती रिपब्लिकन यांनी घेतली. तेसच या झालेल्या वादात राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
बाबासाहेबांना अभिवादन करण्याचा अधिकार प्रत्येकाचाच आहे. तो कोणत्याही धर्माचा असो वा जातीचा. काही लोकांनी नव्यानं इथे येण्यास सुरुवात केली हे चांगलंच आहे. मी जो संघर्ष सुरु केलाय त्याचा जयभीम इम्पॅक्ट आता सुरु झाला आहे. समीर वानखेडे हे कधी चैत्यभूमीवर इतक्या वर्षात अभिवादनाकरता आले का नाही हे मला माहित नाही पण, ते माझ्यासोबत नमाज पढायला नियमितपणे यायचे हे माहिती आहे, असं मलिक म्हणाले. (हे ही वाचा Mahaparinirvan Diwas 2021: डॉ बाबसाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिना निमित्त मुंबईतील चैत्यभूमीच्या आसपासच्या वाहतुकीवर निर्बध.)
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी त्यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने अनुयायी दादरच्या चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत. मध्यरात्रीपासून शेकडो आंबेडकरी अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी रांगा लावल्या आहेत. गर्दी होऊ नये तसेच कोरोना बाबतचे नियम पाळले जावेत म्हणून इथे मोठ्या प्रमाणात पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. गेल्या वर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील कोव्हिडचे संकट असल्याने प्रशासनाने गर्दी न कोव्हिड बाबत सुरक्षेचे उपाय योजना करण्याचे आवाहन केले होते. तरी देखील शेकडो अनुयायी चैत्यभूमीवर दाखल झाले आहेत.