मुंबई: डॉ बाबासाहेब आंबेडकर (DR. babasaheb Ambedkar) यांच्या महापरिनिर्वाण दिननिमित्त (Mahaparinirvan Diwas) 6 डिसेंबर रोजी मध्य मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीला हजारो अनुयायी भेट देतील अशी अपेक्षा असल्याने मुंबई शहर पोलिसांनी (Mumbai Police) शनिवारपासून वाहतूकीवर निर्बंध आणि वळवण्याचा निर्णय घेतला आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारपासून चैत्यभुमीवर डॉ आंबेडकरांना आदरांजली वाहण्यासाठी अनुयांयी शहरात येण्यास सुरुवात केली आहे यातील बहुतांश मंगळवारपर्यंत येथेच थांबण्याची शक्यता आहे. "चैत्यभूमीच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता, रहदारी लगतच्या रस्त्यांकडे वळवली जाईल. वाहतूक सुरळीत व्हावी यासाठी शनिवारी दुपारपासून मंगळवारपर्यंत काही निर्बंध लादले जातील," असे एका वाहतूक पोलिस अधिकाऱ्यानंकडून सांगण्यात आले आहे.
दादर पश्चिमेतील सिद्धी विनायक जंक्शनपासून ते हनुमान मंदिरापर्यंत एकेरी मार्ग असेल. भवानी शंकर रोड ते हनुमान मंदिर किंवा दादर कबुतरखान्यापासून गोखले रोड दक्षिणेकडील जंक्शनपर्यंत एकेरी मार्ग असेल, म्हणजे गोखले रोड दक्षिणेकडून गोपीनाथ चव्हाण चौक मार्गे बेस्ट बसेस आणि आपत्कालीन किंवा उपयुक्तता सेवा वगळता प्रवेश होणार नाही, असे पोलिसांनी सांगितले आहे. सिध्दी विनायक जंक्शन ते हिंदुजा हॉस्पिटल पर्यंतचा SVS रोड सर्व वाहनांच्या वाहतुकीसाठी बंद असेल आणि स्थानिक रहिवाशांना हिंदुजा हॉस्पिटलपासून पांडुरंग नाईक मार्ग जंक्शन रोड क्रमांक पाचपर्यंत जाता येईल. बेस्ट बसेस वगळता, इतर सर्व अवजड वाहने आणि मालवाहकांना माहीम जंक्शनवरून मोरी रोडमार्गे सेनापती बापट रोडकडे वळवण्यात येईल. (हे ही वाचा Mahaparinirvan Diwas 2021: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली.)
चैत्यभूमीच्या परिसरातील सुमारे आठ रस्ते शुक्रवार ते रविवार या कालावधीत 'नो पार्किंग झोन' बनतील, तर माहीममधील सेनापती बापट मार्ग आणि दादर आणि रेतीबंदर माहीम यासह नऊ ठिकाणे पार्किंगसाठी ठेवण्यात आली आहेत. भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार डॉ.आंबेडकर यांच्या पार्थिवावर चैत्यभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. महामानवाला श्रद्धांजली वाहण्यासाठी लोक मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देतात.