महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक आणि उपकेंद्र सहाय्यक पदासाठी 7 हजार जागांची (MAHADISCOM Recruitment) भरती प्रक्रिया गेल्या 8 महिन्यांपासून प्रलंबित आहेत. मात्र, येत्या आठ दिवसांत या जागा भरण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत (Dr. Nitin Raut) यांनी संबंधित विभागांना दिले आहेत. यामुळे रखडलेली ही भरती प्रक्रिया आता पूर्ण होणार असून निवड प्रक्रियेतील उमेदवारांना यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. महावितरण कंपनीमध्ये जुलै 2019 रोजी उपकेंद्र सहाय्यक पदाच्या 2 हजार तर, विद्युत सहाय्यक पदाच्या 5 हजार अशा एकूण 7 हजार जागा सरळसेवा भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती.
महावितरण कंपनीत जुलै 2019 मध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार, 2000 उपकेंद्र सहाय्यक व 5000 विद्युत सहाय्यक या पदांसाठी सरळसेवेची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रलंबित भरती प्रक्रियेचा निकाल तात्काळ जाहीर करून 8 दिवसात संबधितांना सेवेत रूजू करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले आहेत, अशा आशायाचे ट्विट डॉ. नितीन राऊत यांनी केले आहे. हे देखील वाचा- ICSE, ISC Exams 2020 in Maharashtra: कोरोना बाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ICSE, ISC बोर्डाच्या परीक्षा घेणे अशक्य; महाराष्ट्र सरकारचे बॉम्बे हायकोर्टाला स्पष्टीकरण
डॉ. नितीन राऊत यांचे ट्विट-
महावितरण कंपनीत जुलै 2019 मध्ये दिलेल्या जाहिरातीनुसार 2000 उपकेंद्र सहाय्यक व 5000 विद्युत सहाय्यक या पदांसाठी सरळ सेवेची भरती प्रक्रिया राबविण्यात आली. या प्रलंबित भरती प्रक्रियेचा निकाल तात्काळ जाहीर करून 8 दिवसात संबधितांना सेवेत रूजू करून कार्यवाही करण्याचे आदेश दिले. pic.twitter.com/P0crm47zrU
— Dr. Nitin Raut (@NitinRaut_INC) June 23, 2020
उमेदवार किमान 12 वी पास असणे आवश्यक आहे. तसेच त्याच्याकडे राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषदेकडून हे प्रमाणपत्र दिले जाते. उमेदवाराचे वय 18 ते 27 या दरम्यान असणे गरजेचे आहे. विविध आरक्षणानुसार वयामध्ये सूट लागू राहिल. निवड झालेल्या उमेदवाराला पहिल्या वर्षासाठी दर महिन्याला 9000, दुसऱ्या वर्षात 10000 आणि तिसऱ्या वर्षात 11000 मानधन मिळेल. या मानधनातून भविष्य निर्वाह निधी, आयकर, व्यवसाय कर इत्यादी वजा होईल.