लोकसभा निवडणूक 2019: प्रकाश आंबेडकर यांच्याकडून बहुजन वंचित आघाडीचे 4 उमेदवार घोषीत, बी जी कोळसे-पाटील निवडणुकीच्या मैदानात
Prakash Ambedkar (Photo Credits: PTI)

Loksabha Election 2019: लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे (Vanchit Bahujan Aghadi) मराठवाड्यातील 4 उमेदवार भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी जाहीर केले आहेत. आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली परभणी येथे सत्ता संपादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेतच त्यांनी उमेदवारांची घोषणा केली. आगामी लोकसभा डोळ्यासमोर ठेऊन आंबेडकर यांनी प्रचारासाच सपाटा लावला आहे. काँग्रेससोबत बोलणी करण्याची वेळ आता निघून गेल्याचे आंबेडकर यांनी मागेच सांगितले आहे. त्यामुळे आंबेडकरांनी आता लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीत असदुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम (AIMIM) या पक्षाचाही समावेश असल्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, आंबेडकर यांनी लोकसभेसाठी जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये माजी न्यायमुर्ती आणि सामाजिक कार्यकर्ते बी. जी. कोळसे पाटील यांचाही समावे आहे. बी.जी. कोळसे पाटील हे औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून (Aurangabad Lok Sabha constituency) उमेदवारी करणार आहेत. तर, प्रा. विष्णू जाधव बीड लोकसभा मतदारसंघ (Beed Lok Sabha constituency ), अर्जुन सलगर उस्मानाबाद मतदारसंघ (Osmanabad Lok Sabha constituency), डॉ. शरद वानखेडे हे जालना लोकसभा मतदारसंघातून (Jalna Lok Sabha constituency ) निवडणूक लढवणार आहेत. मराठवाड्यातील हिंगोली आणि परभणी मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अद्याप जाहीर झाले नाहीत. या उमेदवारांची घोषणा येत्या 23 फेब्रुवारीला करण्यात येईल असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.

औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून (Aurangabad Lok Sabha constituency)

दरम्यन, बी. जी. कोळसे पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेला औरंगाबाद लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 1998-99 हा अपवाद वगळता 1991 पासून या मतदारसंघातून शिवसेनेचा उमेदवार निवडणून येत आहे. 2004 पासून आज अखेर शिवसेनेचे चंद्रकांत खैरे येथून निवडून येत आहेत. या मतदारसंघातील विद्यमान खासदारही चंद्रकांत खैरे हेच आहेत.

बीड लोकसभा मतदारसंघ (Beed Lok Sabha constituency )

प्रा. विष्णू जाधव यांची उमेदवारी जाहीर झालेला बीड लोकसभा मतदारसंघ हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. 2014 ते 2009 (जयसिंगराव गायकवाड पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) हा अपवाद वगळता 1998 ते 2014 या कालावधीत या मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचा उमेदवार निवडून आला आहे. 2014 मध्ये भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गोपीनाथ मुंडे हे येथून निवडून आले होते. मात्र, दिल्ली येथे गोपीनाथ मुंडे यांचे अपगाती निधन झाले. तेव्हापासून हा मतदारसंघ रिक्त आहे. (हेही रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ: नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून पहिली उमेदवारी जाहीर)

उस्मानाबाद मतदारसंघ (Osmanabad Lok Sabha constituency)

अर्जुन सलगर हे ज्या मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तो उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ बऱ्यापैकी शिवसेनेचे वर्चस्व असलेला आहे. इथे एकादा अपवाद वगळता बऱ्यापैकी सत्तांतर झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पद्मसिंह पाटील हे सध्या इथले विद्यमान खासदार आहेत.

जालना लोकसभा मतदारसंघ (Jalna Lok Sabha constituency)

डॉ. शरद वानखेडे हे लढत असलेले जालना लोकसभा मतदारसंघ हा सुद्धा भाजपचा बालेकिल्ला आहे. 1996 पासून या मतदारसंघात भाजपचा उमेदवार सलग निवडूण आला आहे. 1999 पासून या मतदारसंघातून आतापर्यंत भाजपचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हेच निवडणूक जिंकत आले आहेत.