रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ: नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाकडून पहिली उमेदवारी जाहीर
Narayan Rane | (Photo credit: archived, edited, representative image)

Lok Sabha Elections 2019: शिवसेना (Shiv Sena), काँग्रेस (Congress) मार्गे स्वबळाची घोषणा करत महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष (Maharashtra Swabhiman Party) स्थापना करणारे नारायण राणे (Narayan Rane) यांनी पक्षाच पहिला मेळावा मुंबई येथे घेतला. वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात शुक्रवारी (15 फेब्रुवारी) पार पडलेल्या या मेळाव्यात पक्षाची पहिली उमेदवारी जाहीर झाली. ही उमेदवारी नारायण राणे यांचे पूत्र निलेश राणे (Nilesh Rane) यांच्या नावाने जाहीर झाली आहे. निलेश राणे हे रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदार संघातून लोकसभा निवडणूक लढतील.

दरम्यान, नारायण राणे यांची राजकीय प्रतिमा सुरुवातीपासूनच बंडखोर अशी राहीली आहे. शिवसेनेत असताना आणि शिवसेना सोडून काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यानंतरही राणे यांची राजकीय बंडखोरी कायम राहिली. या काळात त्यांनी घराणेशाहीवरही अनेकदा टीका केली. त्यांच्या टीकेचा खास रोख हा नेहमी शिवसेना आणि ठाकरे कुटुंबीयांवर राहीला आहे. त्यामुळे घराणेशाहीवर टीका करणाऱ्या राणे यांनी स्वत: स्थापन केलेल्या पक्षाची पहिलीच उमेदवारी त्यांनी घरात दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाली आहे. (हेही वाचा, डान्स बार, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे छोटा पेग्विंन खुश असणार -निलेश राणे)

दरम्यान, नारायण राणे यांनी या वेळी शिवसेना आणि भाजपवर टीकास्त्र सोडले. देशावर इतका मोठा हल्ला झाला असताना शिवसेना भाजप नेत्यांना युतीची चिंता आहे. या लोकांना केवळ सत्तेची पडली आहे. यांना केवळ सत्ता हवी आहे. जनतेच्या प्रश्नाशी यांना काहीही घेणे नाही, असे सांगत राणे यांनी टीका केली. दरम्यान, राणे यांनी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.