महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) मध्ये आज वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aaghadi )जालना लोकसभा मतदारसंघात मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या यादीत किमान 15 ओबीसी उमेदवार असावेत यासह 4 मोठ्या मागण्या ठेवल्या आहेत. महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून जालना लोकसभा मतदारसंघातून मनोज जरांगे पाटील आणि पुणे लोकसभा मतदारसंघातून डॉ. अभिजित वैद्य यांना पाठिंबा द्यावा. असा प्रस्ताव वंचित कडून देण्यात आला आहे. दरम्यान वंचित ने मविआ कडे आज 27 जागांचा प्रस्ताव ठेवला आहे. हे वृत्त मात्र वंचित कडून फेटाळण्यात आलं आहे.
मविआच्या प्रत्येक घटकानं पक्ष किंवा त्यांचा निवडून आलेला उमेदवार निवडणूकीपूर्वी आणि नंतर भारतीय जनता पक्षामध्ये सामील होणार नाही, असे लेखी स्वरूपात लिहून घ्यावे असा प्रस्ताव देखील वंचितकडून देण्यात आला आहे. नक्की वाचा: Manoj Jarange Patil On Devendra Fadnavis: मनोज जरांगे पाटील यांचा गंभीर आरोप - 'मला सलाईनमधून विष देण्याचा फडणवीसांचा डाव' .
पहा वंचितच्या चार प्रमुख मागण्या कोणत्या ?
आजच्या महाविकास आघाडीच्या बैठकीत वंचितने मविआला मुख्य 4 अजेंड्यांचा दिलेला प्रस्ताव.#VBAforIndia pic.twitter.com/zX9iyK3Xq0
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) February 28, 2024
27 जागांची मागणी नाही
वंचित बहुजन आघाडीने महाविकास आघाडीकडे 27 जागा मागितल्या ?
उत्तर - नाही.
कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता, सत्यता जाणून घ्या ! pic.twitter.com/TCqoGY31ZS
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) February 28, 2024
मनोज जरांगे पाटील यांनी राज्यात मराठा आंदोलन उभं केलं. त्यानंतर हे भगवं वादळ राज्यभर पोहचवलं. त्यांच्या आंदोलनाला ग्रामीण भागातून मोठा पाठिंबा मिळाला. जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केल्यानंतर त्यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा रंगली होती. अशामध्ये आज वंचित कडून मविआ ने मनोज जरांगे पाटील यांना उमेदवारी द्यावी असा प्रस्ताव ठेवला आहे. तर जरांगे पाटीलांनी आपलं लक्ष्य मराठा आरक्षण असल्याचं म्हटलं आहे. भाजपाचे आशिष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वीच मनोज जरांगे पाटील हे मविआ चे बीडचे उमेदवार असतील असं सांगून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली होती.