लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारतीय निवडणूक आयोग द्वारा या कार्यक्रमाची घोषणा आज (16 मार्च) रोजी करण्यात आली. त्यानुसार देशभरात एकूण सात टप्प्यात मदतान पार पडणार आहे. या निवडणुकांचा भाग म्हणून महाराष्ट्रात एकूण पाच टप्प्यांत मतदान (Lok Sabha Elections 2024 Schedule For Maharashtra) प्रक्रिया पार पडार आहे. राज्यात पहिला टप्पा 26 एप्रिल रोजी तर शेवटचा टप्पा 25 मे रोजी पार पडेल. त्यादरम्यान मधले तीन टप्पे पार पडतील. जाणून घ्या राज्यात कोणत्या तारखेला कोणत्या टप्प्यातील मतदान.
महाराष्ट्रात खाली प्रमाणे एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान पार पडेल
पहिला टप्पा: 19 एप्रिल- रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा: 26 एप्रिल- बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा: 13 मे- रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा: 20 मे- नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा: 25- मे- धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
दरम्यान, महाराष्ट्रात पाच टप्प्यात निवडणुका पार पडत असल्या तरी एकूण देशात एकूण 543 जागांसाठी सात टप्प्यांमध्ये निवडणुका पार पडणार आहेत. त्यापैकी पहिला टप्पा- 19 एप्रिल रोजी मतदान, दुसरा टप्पा- 26 एप्रिल, तिसरा टप्पा- 7 मे, चौथा टप्पा- 13 मे, पाचवा टप्पा- 20 मे, सहावा टप्पा- 25 मे, सातवा टप्पा- 1 जून, सर्व मतदान पूर्ण झाल्यानंतर 4जून रोजी मतमोजणी पार पडणार आहे. (हेही वाचा, Lok Sabha Elections 2024 Schedule: लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर, आदर्श आचारसंहिता जारी)
मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषदेत सांगितले की, आगामी लोकसभा निवडणूक प्रक्रियेत मतदान करण्यासाठी सुमारे 97 कोटी लोक पात्र आहेत. ज्येष्ठ नागरिक असलेल्या आणि 85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मतदारांना घरून मतदान करण्याची परवानगी दिली जाईल. तसेच सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे अशा किमान मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. सध्याच्या लोकसभेचा कार्यकाळ 16 जून रोजी संपत आहे. त्यामुळे तत्पर्वी नवीन सभागृहाची स्थापना करण्यासाठी घटनात्मक पद्धतीने ही निवडणूक पार पडत आहे. आंध्र प्रदेश, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश आणि ओडिशा विधानसभांचा कार्यकाळही जूनमध्ये संपणार आहे. त्यामुळे त्यांचीही निवडणूक यादरम्यानच घेतली जात आहे.
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाने निवडणुकीची घोषणा केल्यानंतर निवडणुकीदरम्यान उमेदवार आणि राजकीय पक्षांसाठी आदर्श आचारसंहिता (MCC) लागू झाली आहे. देशभरात निष्पक्ष निवडणुका सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने एमसीसी, निकाल घोषित होईपर्यंत ही आचारसंहिता कायम राहणार आहे.