Lok Sabha Elections 2019:आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आजपासून पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. या पार्श्वभुमीवर काही कलाकारांनी, नाटककार आणि 112 मराठी लेखकांनी राजकरणाबद्दल द्वेष व्यक्त करु नये आवाहन मतदारांना केले आहे. तसेच कलाकारांनी यापूर्वी भाजपला मतदान करु नका असे म्हटले होते. परंतु साहित्यिकांनी याबद्दल कोणतीही भुमिका बजावली नाही आहे.
त्याचसोबत साहित्यिकात कोणत्याही पक्षाबद्दल त्यांनी केलेल्या वक्तव्यावर सध्या बोलणे बंद केले आहे. तर मतदारांना योग्य तो उमेदवार निवडण्याचा हक्क किंवा कोणत्या पक्षाला मत द्यावे हा मतदाराचा स्वत:चा निर्णय आहे. मराठी मधील काही दिग्गज साहित्यिक भालचंद्र नेमाडे, महेश एलकुंचवार आणि मनस्विनी लता रवींद्र यांनी असे म्हटले आहे की, जनतेने आपण स्वत: आणि पक्ष यांबद्दल राजकीय समीकरणे जुळवून फूट पाडण्याचा प्रयत्न करु नये. तसेच एखाद्याची जात, मारहाण किंवा गोंधळ केलेल्या गोष्टी बाजूला ठेवून योग्य उमेदवाराला मतदान करा असे आवाहन करण्यात आले आहे. (हेही वाचा-Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रात अपंग मतदारांसाठी घरपोच सेवेसह विशेष सुविधा उपलब्ध; जाणून घ्या अपंग मतदारांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा)
'विद्वेषाच्या राजकारणाच्या विरोधात मतदान करा. समताधिष्ठित, बहुविध भारतासाठी मतदान करा. हे पहिले पाऊल आपण लवकरच उचलू शकतो. लोकांच्यात होणारे विभाजन नाकारा. हिंसा, धमक्या आणि सेन्सॉरशिपच्या विरोधात मत द्या. हाच एक मार्ग आहे. आपण अशा भारतासाठी मत देऊ शकतो, जो संविधानाने दिलेली अभिवचने आपल्याला पुन्हा देऊ शकतो,' असे आवाहन लेखकांनी लोकांना केले आहे.