
चित्रपटात रावणाची भुमिका साकारणे म्हणजे थोडे अवघडच आहे. कारण रावणाचे आयुष्य हे अत्यंत निर्दयी आणि क्रुरतेचे होते. परंतु तरीही सिनेसृष्टीतील काही कलाकारांनी रावणाच्या अवतारातील भुमिका साकारत प्रेक्षकांच्या मनावर आपली छाप पाडली आहे. यापूर्वी जेव्हा रामायण हा कार्यक्रम टेलिव्हिजनवर दाखवला जात असे त्यावेली कोणत्याही एका व्यक्तीच्या घरी अन्य शेजारची मंडळीसुद्धा पाहण्यासाठी येत असत.
रावणाची भुमिका फक्त रामायण कार्यक्रमापुरतीच सिमीत राहिली नाही. तर अनेक चित्रपटांमधून सुद्धा कलाकारांना रावणाच्या भुमिका अत्यंत उत्तमपणे साकारल्या आहेत. तर जाणून घ्या कोणत्या कलाकारांनी रावणाच्या भुमिका पार पाडल्या आहेत आणि त्या आजवर प्रेक्षकांना पाहायला आवडतात.(Dussehra 2019: दसऱ्याच्या शुभदिनी चुकून ही करु नका 'या' गोष्टी, नाहीतर आयुष्यभर पश्चताप होईल)
1. अरविंद त्रिवेदी: रामानंद सागर यांच्या द्वारे तयार करण्यात आलेल्या रामायण या कार्यक्रमातून सर्वच कलाकार प्रसिद्ध झाले. त्यामधील एक अरविंद त्रिवेदी आहेत. त्या दरम्यान रामायण पाहणाऱ्या प्रेक्षकांनी रावणाची भुमिका साकारणाऱ्या अरविंद त्रिवेदी यांना एक प्रसिद्ध कालाकार म्हणून घोषित केले.
2. प्रेम नाथ: रामायणावर आधारित कथेवर बनवण्यात येणारे चित्रपट आताच नाही तर यापूर्वी सुद्धा बनवले जात होते. त्यामधीलच एक 1976 मध्ये आलेला बजरंग बली सिनेमा आहे. जेव्हा हनुमान याची गोष्ट निघते त्यावेळी राम आणि रावण हे दोन मुख्य पात्रांची सुद्धा येथए गरज भासते. तर बजरंग बली या सिनेमातून प्रेम नाथ यांनी रावणाची भुमिका साकारली होती.
3. कार्तिक जयराम: टेलिव्हिजनची दुनियाच पार बदलून गेली. अॅक्शन आणि वीएफएक्स दरम्यान रामायण पुन्हा सुरु झाले. त्यानंतर निर्माती एकता कपूर हिने सिया के राम हा कार्यक्रम बनवला. त्यामध्ये कार्तिक जयराम यांनी रावणाची भुमिका यशस्वीपणे पार पाडली.
4. आर्य बब्बर: टीव्ही वरील हनुमान संबंधित काही कार्यक्रम प्रदर्शित करण्यात आले. नुकत्याच आलेल्या संकट मोचक महाबली हनुमान कार्यक्रम प्रेक्षकांसाठी नव्याने प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये विलन म्हणजेच रावणाची भुमिका राज बब्बर यांचा मुलगा आर्य बब्बर याने स्विकारली होती. आर्य याने हिंदी आणि पंजाबी सिनेमासह अन्य चित्रपटात सुद्धा काम केले आहे.
हिंदू धर्मानुसार दसऱ्याच्या सण मोठ्या आनंदाने-उत्साहाने साजरा केला जातो. आजचा दिवस दुष्कर्मावर विजय, असत्यावर सत्य आणि अधर्मावर धर्माचा विजय म्हणून मानला जातो. या दिवशी राज्यभरातील विविध ठिकाणी रावणाचे पुतळे उबभारुन त्याचे दहन केले जाते. तर नवरात्रीच्या दहाव्या दिवशी भगवान राम याने लंकापती रावण याचा वध करत विजय मिळवला होता.