Lok Sabha Election 2019: महाराष्ट्रात अपंग मतदारांसाठी घरपोच सेवेसह विशेष सुविधा उपलब्ध; जाणून घ्या अपंग मतदारांना मिळणाऱ्या सोयी-सुविधा
Representational Image (Photo Credits: Getty Images)

देशभरात लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरु झाली असून उद्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. यात महाराष्ट्रातील नागपूर, वर्धा, भंडारा-गोंदिया, यवतमाळ-वाशिम, रामटेक, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या सात मतदारसंघांचा समावेश आहे. अपंग मतदारांनाही मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी मोफत वाहतूकीची सोय, डोली, घरपोच सेवा या सुविधा दिल्या जाणार आहेत. तसंच मतदान करताना बहिर्गोल भिंगही उपलब्ध करुन देण्यात येईल.

अपंग मतदारांना मिळणाऱ्या सुविधा:

# रँप, व्हिलचेअर आणि स्वयंसेवक यांची सोय.

# अपंग मतदारांना केंद्रापर्यंत आणण्यासाठी आणि परत नेण्यासाठी वाहनांची व्यवस्था.

# अंध आणि दुर्बल मतदारांना त्यांच्यासोबत सहकाऱ्यास नेण्याची परवानगी देण्यात आली आहे.

# अंध आणि अल्पदृष्टी असलेल्या मतदारांसाठी बहिर्गोल भिंगे (मॅग्निफाइंग ग्लास) तसेच मतदान यंत्रावर ब्रेल लिपीची सुविधाही देण्यात येणार आहे.

# मतदान केंद्र पहिल्या किंवा दुसऱ्या मजल्यावर असल्यास डोलीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

या सुविधा पुरवण्यासाठी मतदान केंद्रातील भागात किती दिव्यांग मतदार आहेत, याची यादी तयार करण्यात आली आहे. राज्यात 3 लाख 9 हजार 233 अपंग मतदार असल्याची नोंद झाली आहे. गर्भवती-दिव्यांगाना रांगेविना मतदान करण्यासाठी प्रवेश देणार, निवडणुक अधिकाऱ्यांचा निर्णय

महाराष्ट्रात 11, 18, 23 आणि 29 एप्रिल या चार दिवशी मतदान पार पडणार असून 23 मे रोजी निवडणूकीचा निकाल हाती येणार आहे.