Lok Sabha Elections 2019: नांदेड (Nanded) येथे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी प्रशिक्षण दिले जात आहे. त्यावेळी गर्भवती आणि दिव्यांगांना रांगेशिवाय मतदान करण्यासाठी प्रवेश देण्याचा निर्णय जिल्हा निवडणुक अधिकाऱ्यांनी घेतला आहे.
येत्या निवडणुकीसाठी मतदान हे स्पष्टपणे होण्यासाठी मतदान अधिकाऱ्यांनी बॅलेट युनिट, कंट्रोल युनि आणि व्हीव्हीपॅटती माहिती दिली. तसेच व्हीव्हीपॅट आणि मतदानसोबतचा संबंध नेमका काय हे सुद्धा प्रशिक्षणावेळी सांगण्यात आले. जर दिव्यांग व्यक्ती आणि गर्भवती स्रियांसुद्धा मतदानाचा हक्क बजावण्यास आल्यास त्यांना प्रथम प्राधान्य देण्याचे आदेश निवडणुक अधिकारी अरुण डोंगरे यांनी दिली आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र लोकसभा मतदारसंघ आणि काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप उमेदवार संपूर्ण यादी)
तर येत्या 18 एप्रिल रोज नांदेड येथे दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. तर नांदेड येथून प्रताप चिखलीकर (भाजप), अशोक चव्हाण (काँग्रेस) आणि यशपाल भिंगे (बहुजन वंचित आघाडी) उमेदवारा आगामी लोकसभा निवडणुक लढवणार आहेत. तसेच लोकसभेच्या एकूण 555 जागांपैकी 543 जागांसाठी निवडणूक पार पडणार असून महाराष्ट्रात एकूण 48 लोकसभा मतदार संघामध्ये ही निवडणूक पार पडणार आहे.