लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाकडून प्रचारसभेच्या माध्यमातून विरोधकांवर जोरदार टीका केली जात आहे. याच पार्श्वभुमीवर निवडणुक न लढवण्याचा निर्णय मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी घेतला होता. त्यानंतर आता राज ठाकरे महाराष्ट्रात (Maharashtra) विविध राज्यात आपल्या प्रचारसभेची तोफ डागळताना दिसून येत आहेत. तसेच सभेमध्ये भाजप (BJP) आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीका करण्यात येत असल्याचे चित्र राज ठाकरे यांच्या सभेतून दिसून येत आहे. मात्र भाजप पक्षाने आधी याकडे कानाडोळा केला खरा. पण आता भाजपने राज ठाकरे यांची खिल्ली उडवत असल्याचे दिसून येत आहे.
राज ठाकरे त्यांच्या भाषणामध्ये सत्तेतील सरकारचा व्हिडिओ दाखवतात. त्यावेळी ते लाव रे तो व्हिडिओ म्हणत त्याची सुरुवात करण्यास सांगतात. याच वरुन आता भाजप पक्षाने राज ठाकरे यांची खिल्ली उडवत आमच्याकडे सुद्धा व्हिडिओ असल्याचे ट्वीट करत म्हटले आहे.(हेही वाचा-सुपरफ्लॉप होण्याच्या भीतीने मोदी चित्रपटाचे प्रदर्शन लांबणीवर: राज ठाकरे)
काही व्हिडीओ आमच्याकडे देखील आहेत बरं का ...!
"मनसे नगरसेवक घेतो फेरीवाल्यांकडून हप्ते" #लावरेव्हिडीओ @mnsadhikrut @RajThackeray pic.twitter.com/ZjRfYytZgj
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) April 18, 2019
गुढीपाडव्याच्या सभेपासून राज ठाकरे यांनी मोदी सरकारवर अधिकच टीका करण्यास सुरुवात केली. मात्र राज ठाकरे यांच्या कामांची आणि मनसेच्या विरोधातील बातम्यांचे व्हिडिओ सध्या भाजप पक्षाकडून व्हायरल केले जात आहेत. तर काही दिवसांपूर्वी मनसेच्या कार्यकर्त्या महिलेने साडी चोरण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता.