महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल 2019: शिवसेना पक्षाचे तीन विजयी उमेदवार मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या भेटीला
Shiv Sena ( Photo Credits: Twitter)

लोकसभा निवडणूक निकाल 2019 मध्ये भारतीय मतदारांनी एनडीएच्या बाजूने कौल दिला आहे. देशासह महाराष्ट्रातही मोदी फॅक्टर दिसून आला आहे. मुंबईच्या सहाही लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेना भाजपा युतीचे उमेदवार निवडून आले आहेत. मुंबईच्या प्रत्येकी तीन लोकसभा मतदार संघामध्ये शिवसेना आणि भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. काल मातोश्रीवर देवेंद्र फडणवीस, रामदास आठवले यांनी भेट घेतली होती. आज तीन विजयी शिवसेना खासदारांनी भेट घेतली आहे.

मुंबई नॉर्थ वेस्ट चे उमेदवार गजानन कीर्तिकर, मुंबई साऊथ सेन्ट्रल चे उमेदवार राहुल शेवाळे, मुंबई साऊथ चे उमेदवार अरविंद सावंत यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. आज तिन्ही विजयी उमेदवार मातोश्री वर पोहचले. Maharashtra Lok Sabha Elections Results 2019: लोकसभा निवडणूक निकाल 2019 चे महाराष्ट्रातील 48 विजयी खासदार; पहा संपूर्ण यादी

देशामधील 542 लोकसभा मतदारसंघामधील 350 जागांवर एनडीएला वर्चस्व मिळालं आहे.