महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना व्हायरस (Coronavirus), तापमान वाढ (Temperature) यासारख्या संकटाने विदर्भाला (Vidarbha) काही दिवसांपासून मोठा फटका बसत आहे. अशावेळीच आता आणखीन एक मोठे संकट विदर्भातील शेतकऱ्यांसमोर येऊन ठाकले आहे. हे संकट म्हणजे टोळ धाड (Locust Swarms). विदर्भातील नागपूर (Nagpur), अकोला (Akola), अमरावती (Amravati), वर्धा (Wardha) या जिल्ह्यात टोळ कीटकांनी शेतावर हल्लाबोल केल्याचे समजतेय. शेजारील राज्य मध्य प्रदेश (Madhya Pradesh) व गुजरात (Gujrat) येथून हे टोळ महाराष्ट्रात आल्याचे सांगितले जातेय. यामुळे शेतकरी बांधव पूर्णतः गोंधळून गेले आहेत. मागील 25 वर्षात तरी हे संकट विदर्भात आले नव्हते मात्र अचानक पुन्हा एकदा या कीटकांने धाड मारली असताना आता काय करावे याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. अशा संकट काळात कृषी विभागाने शेतकऱ्यांना आवश्यक ते मार्गदर्शन करावे अशी विनंती आमदार रोहीत पवार (Rohit Pawar) यांनी सुद्धा केली आहे.
दुसरीकडे, विदर्भातील शेती तज्ञांनी सांगितल्यानुसार, या कीटकांपासून शेताचे रक्षण करण्यासाठी आता ठिकठिकाणी कीटकनाशकांची फवारणी सुरु करण्यात आली आहे. तसेच कीटकनाशक फवारताना त्यात पाणी मिश्रित करून मग फवारणी केली जातेय, जेणेकरून शेतात पिकांवर केमिकल्सचा परिणाम होणार नाही. तसेच या टोळ धाडीपासून सर्वांचे रक्षण करण्यासाठी आता नागरिकांना सुद्धा आवश्यक ती माहिती देण्यात आली आहे. Maharashtra Weather Update: देशात सर्वाधिक तापमान असणाऱ्या टॉप 10 यादीत महाराष्ट्रातील 'या' तीन शहरांचा समावेश, 47 अंशाहून अधिक तापमानाची नोंद
रोहित पवार ट्विट
गेल्या २५ वर्षांपासून न दिसलेल्या टोळ धाडीने मध्य प्रदेश, राजस्थानमधून विदर्भातील नागपूर, अमरावती, वर्धा या जिल्ह्याच्या काही भागातही आक्रमण केलंय. याबाबत कृषी विभागाने दखल घेऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावं, ही विनंती.@dadajibhusehttps://t.co/CGZTlIfCoA
— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 26, 2020
दरम्यान, टोळ हे अत्यंत विनाशक कीटक असतात. अतिशय वेगाने विविध भागात त्यांचा प्रसार होतो. हे कीटक रात्रीच्या वेळी प्रवास करू शकत नाही दिवसभरात वाऱ्याच्या दिशेनुसार त्यांचा प्रवास होतो. हे कीटक पालेभाजी आणि फळांसाठी सर्वात जास्त धोक्याचे असतात.