Locust Attack: अमरावती (Amravati) आणि नागपूर जिल्ह्यातील (Nagpur District) काही भागांमध्ये टोळधाडीचे (Locust Attack) आक्रमण झाले आहे. या भागात कृषी विभागामार्फत ड्रोनच्या (Drones) माध्यमातूनही कीटकनाशकांची फवारणी करण्यात येणार आहे. मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नसल्याचं कृषीमंत्री दादा भुसे (Dadaji Bhuse) यांनी सांगितलं आहे.
मध्यप्रदेशातून महाराष्ट्रातील अमरावतीच्या काही भागात 24 मे रोजी टोळधाडीचे कीटक आले. अग्निशमन दलाच्या बंबांच्या माध्यमातून तसेच कीटकनाशक फवारणी यंत्राच्या सहाय्याने त्यांच्यावर फवारणी करून 50 टक्क्यांपेक्षा जास्त नायनाट झाल्याचे कृषीमंत्र्यांनी सांगितले आहे. या किटकांवर फवारणी करण्यासाठी लागणारे कीटकनाशक प्रादुर्भाव असलेल्या भागातील शेतकऱ्यांना कृषी विभागामार्फत मोफत पुरविले जात असल्याचेही भुसे यांनी स्पष्ट केलं आहे. (हेही वाचा - Locust Attack: टोळधाड म्हणजे काय? शेती आणि शेतकऱ्याला किती नुकसानकारक?)
अमरावती आणि नागपूर जिल्ह्यातील काही भागांमध्ये टोळधाडीचे आक्रमण. कृषी विभागामार्फत कीटकनाशकांची फवारणी सुरू. ड्रोनच्या माध्यमातूनही फवारणीबाबत प्रयोग करण्यात येणार. मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नाही- कृषीमंत्री @dadajibhuse pic.twitter.com/Ji7Im9RWUu
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) May 29, 2020
दरम्यान, मुंबईसह कोकण भागात या टोळधाडीचा प्रादुर्भाव नाही. मात्र, गुरूवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये ज्या भागाचा उल्लेख होता तेथे ठाणे विभागाचे कृषी सहसंचालक विकास पाटील यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. परंतु, या भागात टोळधाडीचे आक्रमण झाले नसल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. मात्र, गुजरातकडील भागातून या किटकांचे आक्रमण होऊ शकते. त्यामुळे पालघर आणि गुजरात सीमेलगतच्या भागातील शेतकऱ्यांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असल्याचे पाटील यांनी सांगितले आहे.
गेल्या दोन ते तीन अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा, मोर्शी, वरूड या तालुक्यातील काही भागात टोळधाडीचे आक्रमण झाले होते. त्यामुळे शेतीमालाचे प्रचंड नुकसान झाले होते. टोळधाडीमुळे मोसंबी, भाजीपाला आणि फळबागा वाया गेल्या आहेत.