कोरोना विषाणूने (Coronavirus) संपूर्ण जगात हाहाकार माजवला आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढू लागला आहे. कोरोना विषाणूवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाकडून युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर सोशल मीडियाच्या माध्यमातून (Social Media) खोट्या माहितीचा (Fake News) प्रसार करून लोकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, आता एका प्रमुख हिंदी वृत्तवाहिनीने चक्क खोटी माहिती दिल्याने अनेकांनाच धक्का दिला आहे. भिवंडी (Bhiwandi) येथे तब्बल 6 लाख स्थलांतरित मजूरांची गैरसोय होत आहे. यामुळे या मजुरांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे, असे वृत्त संबंधित वृत्तवाहिनीने दिले होते. मात्र, यात काहीही तथ्थ नसून ही माहिती खोटी असल्याचा दावा पीआयबी महाराष्टाने (PIB in Maharashtra) केला आहे.
संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणूचे जाळे वेगाने पसरत चालले आहे. यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून देशात लॉकडाऊन घोषीत करण्यात आला आहे. दरम्यान, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी, सफाई कर्मचारी, पोलीस कर्मचारी आपल्या जीवाची पर्वा न करता नागरिकांची सेवा करत आहेत. यात पत्रकारांचाही समावेश आहे. मात्र, एका हिंदी वृतवाहिनीने दिलेल्या चुकीच्या वृत्तामुळे आता नागरिक आश्चर्यचकीत झाले आहेत. संबंधित वृत्त वाहिनीने दाखवलेल्या वृत्तनुसार, भिवंडीतील 6 लाख स्थलांतरीत मजूरांना अनाच्या शोधात अनेक संकटाचा सामना करावा लागत असल्याचे वृत्त त्यांनी दिले होते. मात्र, हे वृत्त तथ्यहीन असून या कामगारांना कोरडा शिधा व अन्न पुरविण्यात येत आहे, अशी माहिती पीआयबी महाराष्ट्राने दिली आहे. हे देखील वाचा- धक्कादायक: 22 मार्चपासून आज पहाटे 4 वाजेपर्यंत 11 पोलीस अधिकाऱ्यांसह 38 पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण; महाराष्ट्र पोलिसांची माहिती
पीआयबी महाराष्टाचे ट्वीट-
भिवंडीतील 6 लाख स्थलांतरित मजूरांना अन्नाच्या शोधात रस्तोरस्ती फिरावे लागत असल्याचे वृत्त एका प्रमुख हिंदी वृत्तवाहिनीने दिले होते
मात्र हे वृत्त तथ्यहीन असून या कामगारांना कोरडा शिधा व अन्न पुरविण्यात येत आहे@PIBFactCheck @airnews_mumbai@ddsahyadrinewshttps://t.co/lq4qg3hiAX https://t.co/B1znTN46RY
— PIB in Maharashtra 🇮🇳 #MaskYourself 😷 (@PIBMumbai) April 21, 2020
पोलिस, डॉक्टर्स आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनंतर आता पत्रकारांनाही करोनाची लागण झाली आहे. गेल्या आठवड्यात पत्रकार संघाने मुंबईतील पत्रकार आणि कॅमेरामन यांच्या करोना चाचणीसाठी कॅम्प आयोजित केला होता. त्यामध्ये 168 जणांची करोना चाचणी घेण्यात आली. रविवारी मिळालेल्या रिपोर्ट्सनुसार 168 पैकी 53 जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे. करोनाचा संसर्ग झालेले बहुतांश पत्रकार इलेक्ट्रॉनिक मीडियातील असल्याचे समजत आहे.