प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

अवघे जग कोरोना संकटातून मुक्त होत असताना चीन (China) पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात अडकताना दिसतो आहे. चीनमधील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन (Covid19 Lockdown) लागू करण्यात आला आहे. या लॉकडाऊनमध्ये झालेली लोकांची अवस्था दर्शवणारे व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. प्रामुख्याने शंघाई (Shanghai) शहरातील नागरिकांचे व्हिडिओ नेटीझन्सना विचलीत करुन गेले आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ शंघाई शहरातील एका इमारमधील असल्याचे बोलले जात आहे.

ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर असे कितीतरी व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. जे चीनमधील शंघाय शहरातील असल्याचा दावा केला जातो आहे. ज्यात सरकारी अधिकाऱ्यांनी स्थानिकांवर दबाव टाकताना आणि त्यांना परिणाम भोगण्याची धमकी देताना पाहायला मिळत आहे. चीनच्या सर्वात मोठ्या शहरात 5 एप्रिलपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. या शहरात कोरोनापासून लोकांचा बचाव करण्यासाठी 'झीरो कोविड' पॉलिसी राबविण्याचा प्रयत्न केला जातो आहे. शहरातील 2 कोटी 60 लाखांपेक्षा अधिक लोक लॉकडाऊनमध्ये अडकले आहेत. (हेही वाचा, Coronavirus New Variant: इंग्लंडमध्ये कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटची दहशत; पाच ते 10 वयोगटातील मुलांना अधिक धोका)

ट्विट

सार्वजनिक आरोग्य कायम राखण्यासाठी वैज्ञानिक आणि अमेरिकेत वास्तव्यास असलेले डॉ. एरिक फीगल-डिंग यांनी काही व्हिडिओ पोस्ट केले आहेत. यात काही इमारतींमध्ये नागरिक शंघाई शहर आणि परिसरात बोलली जाणारी भाषा बोलत आहेत. त्यांनी म्हटले आहे की, लोक अशा अवस्थेत फार काळ टीकून राहू शकत नाहीत. ज्यामुळे आगामी काळात काही दुर्घटना होऊ शकते.

ट्विट

याओ मिंग ले आणि याओ सी (Yao ming le” & “yao si) या दोन्हीचा अर्थ म्हणजे 'जगणे किंवा मरणे', परंतू याचा वास्तवातला अर्थ आहे 'मरण मागणे' असा होतो. हे सांगणारा म्हणतो आहे की, हे असेच कायम राहिले तर तो पंख्याला लटकेल. डॉ. फेईगी-डिंग यांनी हे एका ट्विटर थ्रेडमध्ये म्हटले आहे.