महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या दिवसागणित वाढत आहे. या गंभीर परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लॉकडाऊन वाढवण्यात आला असून उद्यापासून लॉकडाऊनचा तिसरा टप्पा सुरु होईल. दरम्यान महाराष्ट्रातील जिल्ह्यांची रेड, ऑरेंज आणि ग्रीन या तीन गटात विभागणी करण्यात आली आहे. तसंच झोननुसार काही सेवा-सुविधा सुरु करण्यास महाराष्ट्र सरकारने परवानगी दिली असून यासाठी सरकारकडून नवी यादी जाहीर करण्यात आली आहे. त्यात झोननुसार कोणत्या सेवा सुरु राहणार याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांचा गोंधळ कमी होण्यास नक्कीच मदत होईल. (तुमचा जिल्हा कोणत्या झोनमध्ये आहे ते पाहण्यासाठी येथे क्लिक करा.)
ट्रेन, मेट्रो, विमान सेवा, शैक्षणिक संस्था, हॉटेल्स, मॉल्स आणि मंदिरे खुली करण्यास कोणत्याही झोनमध्ये परवानगी दिलेली नाही. दवाखाने, मेडिकल्स, किराणा मालाची दुकाने, प्रायव्हेट ऑफिसेस, सरकारी ऑफिसेस, बँका, वित्तीय संस्था आणि कुरिअर, पोस्टल सर्व्हिसेस या सेवा कन्टेंमेंट झोन वगळता सर्व ठिकाणी सुरु राहणार आहेत. कन्टेंमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा आणि अत्यावश्यक वैद्यकीय सेवा सुरु राहतील. तसंच ऑनलाईन जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सर्वच झोनमध्ये सुरु राहणार आहे. रेड झोनमध्ये सरकारी आणि खाजगी कार्यालये 33% कर्मचाऱ्यांच्या आधारावर सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर सलुन, केशकर्तनालय दुकाने केवळ ग्रीन आणि ऑरेंज झोनमध्ये सुरु राहतील. (Lockdown 3.0: रेड झोनमध्ये काही अटींच्या आधारावर दारुच्या दुकानांसह Standalone Shops सुरु करण्यास महाराष्ट्र शासनाची परवानगी; कन्टेंमेंट झोनमध्ये मात्र नियम कडक)
CMO Maharashtra Tweet:
🚨Important Update🚨
What's allowed and not allowed in Maharashtra during the extended period of Lockdown#WarAgainstVirus pic.twitter.com/OW8iX0HxXi
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) May 3, 2020
सध्या महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची संख्या 12296 इतकी झाली असून त्यापैकी 2000 रुग्ण कोरोना संसर्गातून बरे झाले आहेत. तर 9775 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. दरम्यान 521 रुग्णांचा कोरोना संसर्गाने मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात ग्रीन झोनमध्ये 6, ऑरेंजमध्ये 16 तर रेड झोनमध्ये 13 जिल्हे आहेत.