![](https://mrst1.latestly.com/wp-content/uploads/2022/11/Mega-Block-380x214.jpg)
मध्य रेल्वेकडून रविवारी, 5 मे रोजी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवारी ट्रान्स हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक नसल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.25 ते दुपारी 3.35 पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील सेवा माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यावर थांबून डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येईल आणि निर्धारित वेळेपेक्षा 15 मिनिटे उशिरा पोहोचेल. (हेही वाचा - CSMT-Wadala Harbour Train Services Disturb: सीएसएमटी स्थानकात पुन्हा रूळावरून घसरला रेल्वेचा डब्बा; सीएसएमटी-वडाळा सेवा खंडीत)
सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड येथे अप धीम्या मार्गावर वळवण्यात येईल, मुलुंड आणि माटुंगा दरम्यान त्यांच्या संबंधित निर्धारित थांब्यावर थांबेल आणि पुढे माटुंगा स्थानकावर अप जलद मार्गावर पुन्हा वळवण्यात येईल. डाऊन जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल बदलापूर लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.20 वाजता सुटेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल बदलापूर लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून दुपारी 3.39 वाजता सुटेल.
अप जलद मार्गावर, ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल अंबरनाथ लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11.10 वाजता पोहोचेल आणि ब्लॉकनंतरची पहिली लोकल आसनगाव लोकल असेल जी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे 04.44 वाजता पोहोचेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - चुनाभट्टी / वांद्रे डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 ते दुपारी 4.40 पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत असेल.
ब्लॉकपूर्वी पनवेलसाठी शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 11.04 वाजता सुटेल. गोरेगावसाठी ब्लॉकपूर्वीची शेवटची लोकल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 10.22 वाजता सुटेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस साठी ब्लॉकपूर्वी शेवटची लोकल पनवेल येथून सकाळी 09.40 वाजता सुटेल.