CSMT-Wadala Harbour Train Services Disturb: सीएसएमटी स्थानकात पुन्हा रूळावरून घसरला रेल्वेचा डब्बा; सीएसएमटी-वडाळा सेवा खंडीत
सीएसएमटी स्थानकामध्ये रिकामा डब्बा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे यामध्ये एक जण जखमी असल्याची माहिती रेल्वे कडून देण्यात आली आहे.
सीएसएमटी स्थानकात आज (1 मे) पुन्हा रूळावरून रेल्वेचा डब्बा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. ही आठवडाभरातील दुसरी घटना आहे. सोमवारी देखील सीएसएमटी स्थानकात डब्बा घसरला होता. प्रवाशांना सीएसएमटी आणि कुर्ला सेक्शन दरम्यान अप आणि डाऊन दिशेने मेनलाइनवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. गोरेगाव/वांद्रे हार्बर लाईनसाठी प्रवास करणाऱ्या प्रवाशांना DDR Western Line वर अप आणि डाऊन मार्गावर प्रवास करता येणार आहे.
हार्बर लाईन विस्कळीत
Due to some unavoidable circumstances Local train in Harbour line section are suspended between CSMT - Vadala Road Passengers are permitted to travel via Mainline between CSMT and Kurla section in Up and Down Direction.
— DRM Mumbai CR (@drmmumbaicr) May 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2024 05:23 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

