मुंबई: भांडूप येथे स्थानिक क्रिकेटर राकेश पनवार याच्यावर धारदार शस्त्राने वार करत हत्या
Local Cricketer Rakesh Panwar (Photo Credits: ANI)

मुंबईतील (Mumbai) भांडूप (Bhandup) येथे स्थानिक क्रिकेटपटू (Local Cricketer) राकेश पनवार (Rakesh Panwar) याच्यावर तीन अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात राकेश याचा मृत्यू झाला आहे. काल (6 जून) रात्री ही धक्कादायक घटना घडली. हत्येमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

हाती आलेल्या माहितीनुसार, काल रात्री राकेश भांडूप येथील महावीर पेट्रोल पंपवर पोहचला असता तिथे आधीपासूनच दबा धरुन बसलेल्या हल्लेखोरांनी त्याच्यावर हल्ला चढवला. हा हल्ल्यानंतर त्याला जवळच्या स्थानिक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

ANI ट्विट:

राकेश पनवार विवाहीत असून त्याला दोन मुले देखील आहेत. पूर्व वैमनस्यातून राकेशची हत्या करण्यात आली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.