शिवसेना पक्षातील आमदारांच्या सुरक्षिततेसाठी मुंबई पोलीस आयुक्तांना पत्र
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-File Image)

महाराष्ट्रात सत्ता स्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तसेच 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. याच पार्श्वभुमीवर शिवसेना-भाजप मध्ये वाद कायम असून मुख्यमंत्री कोणाचा होणार याकडे आता सर्व जनतेचे लक्ष लागून राहिले आहे. मात्र शिवसेनेने आमच्या पक्षाचा मुख्यमंत्री असावा या मागणीवर ठाम आहेत. त्यासाठीच शिवसेनेच्या नवनिर्वाचित आमदार आणि शिवसेनेचे सहयोगी अपक्ष आमदार हे रंगशारदा हॉटेल मध्ये थांबले आहेत. तसेच सत्ता स्थापनेच्या परिस्थितीत फोडाफोडीचे राजकरण होऊ नये यासाठीच आमदारांना रंगशारदा हॉटेलमध्ये ठेवण्यात आले आहे.

आज संध्याकाळी 7 वाजता रंगशारदा मधून रिट्रिट हॉटेलमध्ये हलवण्यात येणार आहे. त्याचसोबत शिवसेनेचे नवनिर्वाचित आमदार आणि शिवसेनेचे सहयोगी अपक्ष आमदार 8 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर पर्यंत रिट्रीट हॉटेल, मालाड येथे राहणार आहे. त्यामुळे शिवसेनेच्या आमदरांना सुरक्षा व्यवस्था देण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांना पत्र देण्यात आले आहे. दरम्यान आमदरांच्या वास्तव्याच्या ठिकाणी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वारंवार भेटीगाठी आणि चर्चा होणार आहे. त्यामुळेच सर्व आमदारांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संबधित अधिकारी आणि पोलिसांनी योग्य ती व्यवस्था व काळजी घेण्याची आदेश द्यावे अशी विनंती पत्रामधून करण्यात आली आहे.(सत्ता स्थापनेचा तिढा न सुटल्यास शिवसेना भाजप पक्षासोबत युती तोडण्याची शक्यता)

Shiv Sena gives letter to Mumbai Police Commissioner

दुसऱ्या बाजूला शिवसेने स्पष्ट केले आहे की, भाजपला राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच शिवसेना युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे गुरुवारी रात्री उशिरा पर्यंत मुंबईतील रंगशारदा हॉटेलमध्ये पोहचले होते. 9 नोव्हेंबरला विधानसभेचा कार्यकाळ समाप्त होत आहे. तत्पूर्वी सत्ता स्थापन न झाल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होऊ शकते.