प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य- फेसबुक)

Pune: राजगड जिल्ह्यातील पाल खुर्द येथे बिबट्याची क्रूरपणे शिकार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी वनविभागाला बिबट्याच्या शिकारीबद्दल कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच बिबट्याला क्रूरतेने मारण्यात आले होते.

वेल्हे तालुक्यात बिबट्याची शिकार झाल्याने वनविभागाला सांगण्यात आले. तर वनविभागाचे पथक रवाना होऊन शिकार झालेल्या बिबट्याची पाहणी केली. त्यावेळी बिबट्याची नखं मिळवण्यासाठी चारही पंजे तोडले होते. एवढच नसून बिबट्याचे दातही उपटण्यात आले होते. या प्रकरणी नारायण आणि रघुनाथ कोंढाळकर ह्या दोन व्यक्ती बिबट्याची शिकार झालेल्या ठिकाणी संशयास्पद फिरत होते.त्यानंतर वनविभागाने यांच्या घरावर छापे टाकत 16 नखे आणि 2 दात सापडले.

या प्रकरणी तपासणी सुरु केली असता आरोपी नारायण आणि रघुनाथ यांनीच बिबट्याची शिकार केल्याची कबुली दिली. परंतु शिकार झाल्याची घटनेची माहितीसुद्धा आरोपींनी स्वत:हून पोलिसांना दिली असल्याचे सत्य उघडकीस आले आहे.