Vasai Leopard News : वसई किल्ला परिसरात बिबट्या(Leopard)चा वावर वाढला आहे. नुकत्याच एका अपघाताच्या घटनेवरून ही बाब समोर आली आहे. वसई किल्ला परिसरात शुक्रवारी एका दुचाकी(bike)ने बिबट्याला जोरदार धडक दिली. रात्री ८ च्या दरम्यान ही घटना घडल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. वसई किल्ला प्रवेशद्वार ते जेट्टीला जोडणाऱ्या रस्त्यावर फिरत असलेल्या बिबट्याला एका दुचाकी स्वाराने धडक दिली. अपघातानंतर दुचाकीस्वाराने तेथून पळ काढला. त्याच्या गाडीची तुटलेली नंबरप्लेट घटनास्थळावरून वनविभाग(forest department)च्या हाती लागली आहे. (हेही वाचा :Pune Leopard Attack : बापरे! जुन्नरमध्ये थेट रुग्णालयात शिरला बिबट्या; हल्ल्यात वनरक्षक जखमी )
या अपघातात बिबट्या जखमी झाला आहे.परिणामी, अपघातामुळे या भागात बिबट्याचा वावर असल्याचं स्पष्ट झालं असून परिसरात दहशतीचं वातावरण आहे. वनविभाग आणि वाईल्डलाईफ वेल्फेअर असोसिएशन संस्थेमार्फत बिबट्याचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेनंतर बिबट्याला पकडण्यासाठी वसई किल्ल्यामध्ये वन विभागाकडून अनेक कॅमेरे लावण्यात आले आहेत. त्यामध्ये बिबट्या कैद झाला आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे. (हेही वाचा :Pune Leopard: पुण्याच्या राजीव गांधी प्राणीसंग्रहालयातून बिबट्ट्याचे पलायन, नागरिकांना न घाबरण्याचे आवाहन )
अपघातानंतर रात्री दोन वाजताच्या सुमारास हे कॅमेरे बसवण्यात आले. त्यानंतर परिसरात पाहणी केली असता किल्ल्याच्या परिसरामध्ये बिबट्याच्या पायांचे ठसे देखील सापडले आहेत. सध्या वन विभागाकडून बिबट्याचा शोध सुरू आहे तसेच पोलिसांकडून अधिकृत नोटीस देखील जाहीर करण्यात येणार असून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.