Disguise Accuse Arrested: वेशांतर करुन घरी आलेल्या आरोपीस 36 वर्षांपूर्वीच्या हत्या प्रकरणात अटक
Arrest | (Photo courtesy: archived, edited, symbolic images)

जवळपास तीन दशकांहून अधिक काळ पोलिसांना गुंगारा देणाऱ्या एका आरोपीस अटक करण्यात मुंबई (Mumbai) पलिसांना यश आले आहे. क्लेमेंट लोबो (Clement Lobo) असे आरोपीचे नाव आहे. क्लेमेंट लोबो याने एका व्यक्तीची हत्या केली. त्याने हा गु्न्हा केला तेव्हा तो 19 वर्षांचा होता. हत्या प्रकरणात पोलिसांच्या रडारवर आल्यानंतर तो फरार झाला. तो सातत्याने देशविदेशात पळत होता. तसेच, देशातही सातत्याने स्थान बदलत असे. त्याने आपली ओळख बदलली होती. आताही त्याला अटक करण्यात आली तेव्हा तो वेशांतर करुन वसई (Vasai) येथील घरी आला होता. पोलिसांनी त्याला माणिकपूर पोलिसांनी (Manickpur Police) अटक केली.

काय आहे प्रकरण?

वसई येथील रस्त्याकडेला कॅसेटवाला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सलीम अली नावाच्या व्यक्तीची 30 नोव्हेंबर 1988 रोजी हत्या झाली होती. आपल्या मुलासोबत फराळ करत असताना सलीम यांच्यावर कथीतपणे हल्ला करण्यात आला. ज्यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. प्राप्त माहितीनुसार, वसई परिसरात कॅसेटचे दुकान असलेले सलीम सात हल्लेखोरांच्या टोळीला बळी पडले. जवळपास सर्व हल्लेखोर वीस वर्षांचे होते. त्यांनी त्याच्यावर धारदार शस्त्रांनी वार केले. उल्लेखनीय म्हणजे, या हल्ल्यात सलीमचा मुलगा सुखरूप बचावला. कथितरित्या परिसरात दहशत निर्माण करणारी व्यक्ती म्हणून सलीमची ओळख होती आणि सलीमचे स्थानिक राजकीय पक्षाशीही संबंध होते. (हेही वाचा, Vasai Crime: चप्पल आणि बॅग ठेवण्यावरून वाद, रागाच्या भरात चाकूने केला वार, वसईत निर्घृणपणे हत्या)

दरम्यान, वसई पोलिसांनी सलीम अली याच्या हत्या प्रकरणात विजय राणे, शंकर माकन, धर्मा धर्मेंद्र, शेखर पुजारी, चंद्रशेकर शेट्टी आणि धनंजय भोलूर यांच्यासह सहा संशयितांना तत्काळ अटक केली. तथापि, लोबो गुन्ह्याच्या ठिकाणाहून पळून जाण्यात यशस्वी झाला. तेव्हापासून तो फरार होता. पण, पोलिसांनी प्रकरणाचा तपास सुरुच ठेवला होता आणि ते लोबो याच्या मागावर होते. अखेर प्रदीर्घ काळानंतर त्याला अटक केली. आरोपी लोबो याचे वय सध्या 55 वर्षांचे आहे.

या प्रकरणातील आरोपीस अटक करण्यासाठी पोलीस प्रदीर्घ काळापासून प्रयत्न करत होते. मात्र, आरोपी हा मोठ्या चतुराईने पोलिसांना गुंगारा देत होता. तो सातत्याने वेश बदलून फिरत असे. त्याने स्वत:ची ओळखही बदलली होती. त्यामुळे तो नेमका कोठे आहे याचा ठावठिकाणाशो शोधणे पोलिसांसाठी काहीसे कठीण होते. मात्र, आरोपीची चाल पोलिसांच्या लक्षात आली होती. तो त्याच्या नेहमीच्या सवयीने वेश बदलू घरी आला आणि पोलिसांच्या जाळ्यात सापडला.