Mumbai Shocker: नालासोपारा येथे गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू, आरोपी पती आणि सावत्र मुलाला अटक

मुंबईतून एक अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. गर्भवती महिलेला तिचा पती आणि सावत्र मुलाने गर्भपाताच्या गोळ्या खाण्यास भाग पाडल्याने महिलेला जीव गमवावा लागला.

Mumbai Shocker: नालासोपारा येथे गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू, आरोपी पती आणि सावत्र मुलाला अटक
Jail Pixabay

Mumbai Shocker: गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्याने गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्याची घटना नालासोपारा येथे घडली. प्रिया दुबे असे 28 वर्षीय मृत गर्भवती महिलेचे नाव आहे. मृत महिलेला तिच्या पती आणि सावत्र मुलाने गर्भाताच्या गेळ्या खाण्यास जबरदस्ती केली होती. त्या दोघांनाही पोलिसांनी अटक केली आहे. मृत्यूवेळी महिला 8 महिन्यांची गर्भवती होती. मिळालेल्या माहितीनुसार, मृत प्रिया दुबे हिने काही महिन्यांपूर्वी पति जयप्रकाश दुबे (40)आणि सावत्र मुलगा सचिन (20) विरोधात तक्रार दाखल केली होती. (हेही वाचा:Worms Found in Amul Buttermilk Package: अमूल ब्रँडच्या ताकात आढळला किडा; ग्राहकाची सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करून कंपनीकडे तक्रार )

TOI च्या वृत्तानुसार, मृत महिलेला अनेकवेळा घरगुती अत्याचारांना सामोर जाव लागल होतं. जून 2023मध्ये दोघांचे लग्न झाले होते. तेव्हापासून पती प्रियाकडे हुंड्याची मागणी करत होता. त्यामुळे अनेकदा प्रियाला शाब्दिक शिवीगाळाला सामोर जावं लागलं. 7 एप्रिल रोजी जेव्हा जयप्रकाशने प्रियाला तिच्या पोटावर मारहाण केली होती. या वादाच्या वेळी मुलगा सचिन याने मध्यस्थि करत वाद थांबवला. मात्र, नंतर दोघांनी मिळून प्रियाला तिच्या इच्छेविरुद्ध गर्भपात करण्यास प्रवृत्त केले. तेव्हा धाबरलेल्या प्रिया हिने गर्भपाताची गोळी खाल्ली. त्यानंतर तिची पर्कृती बिघडली. तेव्हा तिने तिच्या आईचे घर गाठले.तरीही तिची प्रकृती बिघडली. तिला रक्तस्त्राव झाला .10 एप्रिल रोजी तिला स्थानिक नागरी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पर्कडती आणखी बिघडत असल्यामुळे तिला नायर रुग्णालयात हलवण्यात आले, जिथे 2 जुलै रोजी तिचा मृत्यू झाला.

(महिला आणि बाल हेल्पलाइन क्रमांक: चाइल्डलाइन इंडिया - 1098; महिला हेल्पलाइन - 181; राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाइन - 112; राष्ट्रीय महिला आयोग हेल्पलाइन अगेन्स्ट व्हायोलेंस - 7827170170; पोलिस महिला / ज्येष्ठ नागरिक हेल्पलाइन - 1091/ 1291 महिला आणि बेपत्ता - 1094.)

(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2024 04:41 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).