Worms Found in Amul Buttermilk Package: अमूल ब्रँडच्या ताकात आढळला किडा; ग्राहकाची सोशल मिडीयावर व्हिडिओ शेअर करून कंपनीकडे तक्रार
जर तुम्हालाही पॅकबंद खाद्यपदार्थ खायचे शौकीन असाल तर काळजी घ्या, कारण कोणताही सीलबंद पदार्थ न तपासता खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता. आशीच एक घटना सध्या समोर आली आहे.
Worms Found in Amul Buttermilk Package: अमूल ब्रँडच्या आईस्क्रीममध्ये किडा आढळल्याची घटना घडल्यानंतर आता अमूलच्या ताकामध्ये किडा आढळल्याचे समोर आले आहे. त्यामुळे जर तुम्हीही पॅकबंद अन्न खाण्याचे शौकीन असाल तर काळजी घ्या. कोणतेही सीलबंद अन्न न तपासता खाल्ल्याने अशा गोष्टींना सामोर जावं लागेल. @imYadav31 नावाच्या युजरने एक्स पोस्ट करत त्याबाबतची तक्रार अमूलकडे केली आहे. एक्स पोस्टमध्ये त्याने म्हटेल की, 'त्याला अमूलच्या हाय प्रोटीन ताकात कीडा आढळला. कंपनीला टॅग करताना वापरकर्त्याने लिहिले की, मी अमूल ब्रँडच्या गुणवत्तेबाबतच्या वचनबद्धतेसाठी नेहमीच विश्वास ठेवला आहे, परंतु या घटनेमुळे अमूल उत्पादनांची गुणवत्ता आणि सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता निर्माण झाली आहे.' (हेही वाचा:Mumbai Airport Gold Seized: मुंबई विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई; 9 कोटींचं सोनं जप्त, 7 जणांना अटक )
पोस्ट पहा
🚨 Stop Buying products from @Amul_Coop website 🚨
Hey Amul you have sent us WORMS along with your high protien buttermilk.
I am writing to express my deep dissatisfaction after discovering worms in the buttermilk I purchased recently. This experience was incredibly..... pic.twitter.com/vmLC4rp89z
— Gajender Yadav (@imYadav31) July 17, 2024
वापरकर्त्याने पुढे लिहिले की, ताक ऑनलाइन ऑर्डर केल्यानंतर, पॅकेट फोडताच, त्यातून तीव्र दुर्गंधी येत होती. ताक आधीच खराब झालेलं दिसत होतं. या घटनेमुळे अमूलच्या उत्पादन आणि पॅकेजिंग प्रक्रियेच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Jul 17, 2024 03:28 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

