Mumbai Airport Gold Seized: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. 13.24 किलो सोनं जप्त करण्यात आलं असून, 7 जणांना अटक करण्यात आली आहे. त्याशिवाय, काही परदेशी चलन जप्त करण्यात आले आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल 9 कोटींच्या घरात असून त्यात इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा देखील समावेश आहे. याप्रकरणी पोलिसांनी सात जणांना अटक केली आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात सोनं सापडल्यामुळे विमानतळावर मोठी खळबळ उडाली होती. (हेही वाचा:Mumbai Airport Gold Seized: अंतर्वस्त्रात लपवून आणलेले 32 किलो सोनं मुंबई विमानतळावर पकडलं; दोन परदेशी महिलांना अटक )
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर 69 लाख रुपयांच्या सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी एका प्रवाशाला अटक करण्यात आली आहे. जेद्दाहून दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे विमान क्रमांक एआय 192 मधून सोन्याची तस्करी करण्यात आली. आरोपीने त्याच्या प्राइवेट पार्टमध्ये सोने लपवले होते. न्यूज 18 मधील वृत्तानुसार, आरोपींनी प्रवासादरम्यान नाश्ता घेण्यास नकार दिला होता. ज्यामुळे फ्लाइट क्रूला संशय आला आणि प्रवासी दिल्ली विमानतळावर उतरताच त्याला ताब्यात घेण्यात आले.
वास्तविक, साडेपाच तासांच्या फ्लाईटमध्ये एअर होस्टेसने प्रवाशाला पाणी, चहा, जेवण आणि इतर अल्पोपहार ऑफऱ केला होता. मात्र, त्यांनी काहीही घेण्यास नकार दिला. त्यामुळे क्रू मेंबर्सना संशय आला आणि त्यांनी कॅप्टनला माहिती दिली. त्यानंतर तपासादरम्यान ही घटना समोर आली