Devendra Fadnavis Lav Re To Video | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)Chhatrapati

Devendra Fadnavis Osmanabad Visit: विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज 'लाव रे तो व्हिडिओ' (Lav Re To Video) म्हणत राज ठाकरे यांच्या मार्गावरुन गेले. राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी फडणवीस सध्या उस्मानाबाद (Osmanabad) आणि लातूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray), उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar) यांच्या भाषणाचा जुना व्हिडिओ दाखवला. त्यामुळे फडणवीस हे राज ठाकरे ( Raj Thackeray) यांच्या 'लाव रे तो व्हिडिओ'च्या प्रेमात पडल्याची चर्चा राजकी वर्तुळात रंगली आहे.

या वेळी बोलताना फडणवीस म्हणाले, शरद पवार यांच्यासारखा जाणकार माणूस राज्यात नाही. त्यांना सर्व कायदे, नियम माहिती आहेत. परंतू, सध्या त्यांच्यावर राज्य सरकारचा नाकर्तेपणा झाकण्याची जबाबदारी आहे. तेवढेच काम ते करत आहेत, अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी ते आज उस्मानाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. या वेळी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, राज्याने प्रत्येक वेळी केंद्राकडे बोट दाखवणे थांबवायला हवे. राज्य सरकार ज्या जीएसटीच्या पैशांबाबत बोलते. तो पैसा केंद्रालाही मिळाला नाही. केंद्राचाही जीएसटी घटला आहे. तरीही राज्य सरकारांना पैसे देण्यासाठी केंद्र सरकारने 1 लाख कोटी रुपयांचे कर्ज काढले आहे. त्यामुळे हा पैसा राज्यांना मिळणार आहे. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत जाहीर करावी, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. (हेही वाचा, CM Uddhav Thackeray to Visit Osmanabad: अतिवृष्टीग्रस्त भागांच्या पाहणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 21 ऑक्टोबर रोजी उस्मानाबाद दौऱ्यावर; जाणून घ्या संपूर्ण कार्यक्रम)

दरम्यान, 1 लाख 20 हजार कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज राज्याला काढता येतं. महाराष्ट्राने आतापर्यंत 60 हजार रुपयांचे कर्ज काढले आहे. आणखी 60 हजार रुपयांचे कर्ज काढता येऊ शकतं, असं विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.