MLA T Raja Singh | (File Image)

तेलंगणातील आमदार टी. राजासिंग (T. Raja Singh) यांच्या विरोधात महाराष्ट्रामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार टी. राजासिंग हे तेलंगणा राज्यातील हैदराबादच्या (Hyderabad) गोशामहाल मतदारसंघाचे आमदार आहेत. आक्षेपार्ह वक्तव्य प्रकरणी त्यांच्या विरोधात लातूर पोलिसांकनी (Latur Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त (Shiv Jayanti) काढण्यात आलेल्या बाईक रॅली दरम्यान आमदार टी. राजासिंग यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. आमदार टी. राजासिंग यांनी यांच्यावर आक्षेपार्ह विधानाचा आरोप झाल्यानतर सहाय्यक संचालक आणि सरकारी अभियोक्ता कार्यालयाचा अभिप्राय मागविण्यात आला. त्यानतर आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आमदार टी. राजासिंग यांनी शिवजयंतीनिमित्त आयोजित करण्यात कार्यक्रमात बोलताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आमदार टी. राजासिंग यांनी म्हटले होते की, हिंदू आणि मुसलमान हे कधीच एकमेकांचे भाऊ-भाऊ होऊ शकत नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे कधी औरंगजेब होऊ शकतील का? तसेच महाराणा प्रताप हे कधी अकबर होऊ शकतील का? असा सवाल आमदार टी. राजासिंग यांनी उपस्थित केला होता.

पुढे बोलताना आमदार टी. राजासिंग यांनी म्हटले की,  हिंदू समाज हा गाईची पूजा करणारा आहे. जो समाज गायींना मारतो तो समाज आणि हिंदू समाज भाऊ भाऊ कसा होऊ शकतो? असेही आमदार टी. राजासिंग यांनी म्हटले होते. शिवाय वंदे मातरम गाणारा आणि वंदे मातरम गाण्यास विरोध करणारा भाऊ-भाऊ होऊ शकतात का? असा सवालही टी. राजासिंग यांनी पुडे जोडला.